घर घेण्याची हीच नामी संधी! 

रेखा धामणकर  (चार्टर्ड अकाउंटंट) 
Monday, 21 December 2020

सवलतीपूर्वीचा मुद्रांक शुल्काचा दर पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक या ठिकाणासाठी ५ टक्के + १ टक्का एलबीटी व बाकीच्या भागांसाठी ६ टक्के + १ टक्का एलबीटी असा आहे.

सध्याच्या मंदीच्या काळात महाराष्ट्र सरकारने जागा किंवा घर विकत घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने घर घेताना भरावी लागणाऱ्या मुद्रांक शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात सवलत जाहीर केली आहे.

सवलतीपूर्वीचा मुद्रांक शुल्काचा दर पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक या ठिकाणासाठी ५ टक्के + १ टक्का एलबीटी व बाकीच्या भागांसाठी ६ टक्के + १ टक्का एलबीटी असा आहे. त्यामध्ये सरकारने ३१ डिसेंबरपर्यंतच्या खरेदीसाठी ३ टक्क्यांची सवलत; तसेच १ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ या काळात केल्या जाणाऱ्या जागांच्या व्यवहारावर २ टक्के सवलत घोषित केली आहे. 
वाचकांच्या सोयीसाठी लागू होणाऱ्या मुद्रांक शुल्काचा तक्ता सोबत दिला आहे - 

३१ डिसेंबरपर्यंत पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक २% + १% एलबीटी 
३१ डिसेंबरपर्यंत इतर ठिकाणी ३% + १% एलबीटी 
जानेवारी ते मार्च २०२१ पुणे, मुंबई, नागपूर व नाशिक ३% + १% एलबीटी 
जानेवारी ते मार्च २०२१ इतर ठिकाणी ४% + १% एलबीटी 

काही महत्त्वाच्या बाबी 
- ही सवलत या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने घोषित केलेल्या मुद्रांक शुल्कातील १ टक्का सवलतीच्या व्यतिरिक्त आहे. 
- नोंदणी फीमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत नाही. सध्याची नोंदणी फी ही खरेदी किमतीच्या १ टक्का, जास्तीत जास्त रु. ३०,००० आहे. 
- एलबीटी १ टक्का द्यावा लागणार आहे, त्यात कोणतीही सवलत दिली गेलेली नाही. अर्थात, एलबीटी फक्त महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या जागेलाच लागू होईल. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आपणा सर्वांना माहिती असेलच, की हे मुद्रांक शुल्क व नोंदणी फी ही जागेची सरकारी किंमत (Ready Reckoner Value) व ज्या किमतीला व्यवहार केला गेला आहे (खरेदीच्या करारामध्ये लिहिली गेलेली किंमत) यातील जी रक्कम जास्त असेल, त्यावर लागू होते. खरेदीदाराला (ज्याने मुद्रांक शुल्क व नोंदणी फी भरली आहे) अदा केलेल्या मुद्रांक शुल्क व नोंदणी फीची प्राप्तिकर कायद्याच्या ८० सी कलमांतर्गत वजावट मिळते. 

अर्थव्यवस्थेचं मोडलंय कंबरडं;मोदी सरकारची अर्थनीती सफशेल अयशस्वी ठरलीय का?

एकूण देशांतर्गत असणारी मंदीची परिस्थिती, जागाखरेदीचे उपलब्ध असणारे विविध पर्याय, बँका व वित्तीय संस्थांनी गृहकर्जावरील कमी केलेले व्याजदर, पीएमआरवाय या योजनेंतर्गत सरकारने जाहीर केलेल्या सवलती या बाबींचा विचार करता स्वत:ची जागा वा घर घेणे हे सर्वसामान्य जनतेच्या आवाक्यात आले आहे, असे आपण निश्चित म्हणू शकतो. म्हणूनच स्वत:ची जागा वा घर घेण्याचे वा बांधण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची हीच वेळ आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rekha dhamankar write article about great opportunity to buy a home