वायदे बाजारात रिलायन्सवर बंदी

Reliance barred from equity derivatives trading for 1 year with Immediate effect
Reliance barred from equity derivatives trading for 1 year with Immediate effect

नवी दिल्ली : भांडवली बाजार नियंत्रक संस्था "सेबी'ने "इनसायडर ट्रेडिंग'प्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अन्य बारा कंपन्यांवर शेअर बाजारातील वायदे व्यवहार करण्यावर एक वर्षासाठी बंदी घातली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजला 447 कोटी रुपये दंड भरावा लागणार आहे. यावर 29 नोव्हेंबर 2007 पासून 12 टक्के व्याज भरावे लागणार असून, हा दंड व व्याज 45 दिवसांच्या आतमध्ये भरावे लागणार आहे. "इनसायडर ट्रेडिंग'प्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजविरोधात सुमारे दहा वर्षे खटला सुरू होता. कंपनीने "इनसायडर ट्रेडिंग'मधून 513 कोटी रुपये कमाविल्याचे "सेबी'ने म्हटले आहे. "सेबी'ने रिलायन्स पेट्रोलियम "इनसायडर ट्रेडिंग'प्रकरणी 13 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com