रिलायन्सने पार केला १४ लाख कोटींचा टप्पा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 September 2020

रिलायन्स इंडस्ट्रीजने आज १४ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली पहिली भारतीय कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे. रिलायन्सच्या समभागांनी आज २ हजार ३४३ रुपये असा सर्वकालीन उच्चांक नोंदविल्याने हा टप्पा कंपनीने सहज पार केला. आज रिलायन्समुळेच भारतीय निर्देशांकांनी पावणेदोन टक्‍क्‍यांनी उसळी घेतली.

मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजने आज १४ लाख कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली पहिली भारतीय कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे. रिलायन्सच्या समभागांनी आज २ हजार ३४३ रुपये असा सर्वकालीन उच्चांक नोंदविल्याने हा टप्पा कंपनीने सहज पार केला. आज रिलायन्समुळेच भारतीय निर्देशांकांनी पावणेदोन टक्‍क्‍यांनी उसळी घेतली.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ६४६ अंशांनी वधारून ३८,८४० अंशांवर बंद झाला; तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १७१ अंशांनी वाढून ११,४४९ अंशांवर स्थिरावला. रिलायन्ससह एशियन पेंट्‌स (बंद भाव २,०६२ रु.), ॲक्‍सिस बॅंक (४४७ रु.), इंडसइंड बॅंक (६२० रु.) यांनी निर्देशांच्या वाढीस हातभार लावला; तर टाटा स्टील (४०७ रु.), सन फार्मा (५०७ रु.) व भारती एअरटेल (४९७ रु.) यांच्या भावात घसरण झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सिल्हर लेक’ने आज रिलायन्स रिटेलमध्ये साडेसात हजार कोटी रुपये गुंतवून त्यांचा पावणेदोन टक्के हिस्सा खरेदी करण्याची तयारी दर्शविल्याचे वृत्त आले. त्यामुळे आज गुंतवणूकदारांनी रिलायन्सच्या समभागांची तुफान खरेदी केली. २,३४३.९० रुपये अशा सर्वकालीन उच्चांकाला स्पर्शून नंतर रिलायन्स २,३१४.६५ रुपयांवर बंद झाला. सिल्व्हर लेकच्या निर्णयामुळे आता रिलायन्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी बड्या गुंतवणूकदारांची पुन्हा रांग लागेल, या आशेने गुंतवणूकदारांनी आज खरेदी केली.

रिलायन्सनंतर टाटाचा क्रमांक
रिलायन्सच्या सर्व समभागांचे मिळून एकत्रित बाजारमूल्य १४ लाख ६७ हजार ३५० कोटी रुपये एवढे झाले झाले. भांडवली बाजारात रिलायन्सचे ६३३ कोटी ९४ लाख ४ हजार ४९६ समभाग आहेत. तिच्यानंतर दुसरा क्रमांक टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचा (टीसीएस) असून तिचे मूल्य ८ लाख ७४ हजार ९०६ कोटी रुपये झाले आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance crosses Rs 14 lakh crore mark