esakal |  अरे वाह! रिलायंस उद्योगसमूह कर्जमुक्त; अवघ्या 58 दिवसात उभारले तब्बल 'इतके' लाख कोटी..
sakal

बोलून बातमी शोधा

mukesh ambani

31 मार्च 2020 पर्यंत रिलायंस उद्योगसमूहाच्या डोक्यावर एकुण 1,61,000 कोटी रुपये कर्ज होते. कंपनीने मार्च 2021 पर्यंत कर्जमुक्त होण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. लॉकडाऊनच्या काळात रिलायंस जिओमध्ये  जगभरातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. त्यामुळे मुदतीपुर्व रिलायंस उद्योगसमूह कर्जमुक्त झाला आहे.

 अरे वाह! रिलायंस उद्योगसमूह कर्जमुक्त; अवघ्या 58 दिवसात उभारले तब्बल 'इतके' लाख कोटी..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुदतीपुर्व कर्जमुक्त होण्याचे टार्गेट रिलायंस उद्योगसमूहाने पुर्ण केले आहे. केवळ 58 दिवसात रिलायंसने रेकॉर्ड ब्रेक 1.75 लाख कोटी रुपये उभारले आहे. आतापर्यंत रिलायंस जिओमध्ये 1,15,693 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आहे. तर कंपनीने राईट इश्यूच्या माध्यमातून 53,124 कोटी रुपये गोळा केले आहे. 

31 मार्च 2020 पर्यंत रिलायंस उद्योगसमूहाच्या डोक्यावर एकुण 1,61,000 कोटी रुपये कर्ज होते. कंपनीने मार्च 2021 पर्यंत कर्जमुक्त होण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. लॉकडाऊनच्या काळात रिलायंस जिओमध्ये  जगभरातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली. त्यामुळे मुदतीपुर्व रिलायंस उद्योगसमूह कर्जमुक्त झाला आहे.अशी घोषणा रिलायंसचे संचालक मुकेश अंबानी यांनी केली आहे.

हेही वाचा: सूर्यग्रहणानंतर कोरोनाचा प्रभाव खरंच कमी होणार? जाणून घ्या काय म्हणतायत खगोल अभ्यासक..

रिलायंस समूहाला कर्जमुक्त करण्याचे आश्वासन मी कंपनीच्या शेअरधारकांना दिले होते. 31 मार्च 2021 च्या पुर्वी हे आश्वासन मी पुर्ण करु शकलो. हे मी अंत्यत नम्रतापुर्वक आणि आनंदाने जाहिर करतो. अस मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.

रिलायंस जिओ या डिजीटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिलायंसने जगभरातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांना आकर्षित केले. जवळपास 11 बड्या गुंतवणूकदारांनी जिओमध्ये 1,15,693 कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळवणारी रिलायंस ही जगातिल अंत्यत मोजक्या कंपन्यापैकी एक ठरली आहे.  या गुंतवणूकीच्या मोबदल्यात कंपनीने जिओमधील 24.7 टक्के समभाग विकले आहे.

महत्वाचे म्हणजे जग जेव्हा कोरोना संकटाशी मुकाबला करत होता, त्यावेळी रिलायंसमध्ये गुंतवणूकीचा ओघ सुरु होता. 22 एप्रिल ला फेसबुकने 43,574 कोटी रुपयाची गुंतंवणूक केली. त्यानंतर तब्बल 11 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे.

हेही वाचा: मोठी बातमी : ...म्हणून सुशांत होता प्रचंड तणावात ? तीन दिवसांपूर्वीच नोकरांना म्हणाला....

"शेअरधारकांच्या आशा, अपेक्षा पुर्ण करणे हे रिलायंसच्या डिएनएमध्ये आहे. रिलायंस उद्योगमूह हा कर्जमुक्त  झाला आहे याचा मला अभिमान आहे. प्रगती, विकासाचे  यापेक्षाही मोठे  मापदंड आम्ही निश्चित करणार असून, ते पुर्णही करु. देशाच्या विकासात रिलायंस योगदान देत राहणार आहे", असे रिलायंस उद्योगसमूहाचे संचालक मुकेश अंबानी यांनी म्हंटले आहे. 
reliance group is Debt free now read full story 

loading image
go to top