जिओफोनवरही आता फेसबुक वापरता येणार

वृत्तसंस्था
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

मुंबई: फेसबुक हे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आता 'जिओफोन'वर वापरणे शक्य होणार आहे. 'न्यू व्हर्जन ऑफ फेसबुक अॅप' हे जिओच्या KaiOs या वेब बेस ऑपरेटींग सिस्टिमवर आधारित आहे. जिओफोनसाठी हे विशेष अॅप या ऑपरेटींग सिस्टिमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

 नव्या फेसबुक अॅपच्या माध्यमातून अनेक फिचर फोन वापरकर्त्यांना फेसबुक वापरणे सहज शक्य होईल. या अॅपच्या माध्यमातून पुश नोटीफिकेशन, व्हिडिओ, वेब बेस ऑपरेटींग सिस्टिम यासाठी एक्सटरनल सपोर्ट मिळतो. अॅपमध्ये कर्सरचा पर्यायही देण्यात आला आहे. त्यामुळे फेसबुकवरील न्यूजफीड आणि फोटो अशा प्रसिद्ध फिचरच्या वापरासाठी त्याचा उपयोग होईल.

 जिओच्या फिचर फोनच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनसारखा अनुभव देण्याचा जिओने प्रयत्न केला आहे. जिओ आता जिओफोनवर आणखी काही अॅप उपलब्ध करून देण्याच्या तयारीत आहे. त्याची सुरूवात फेसबुकपासून करण्यात आली आहे. भारतातल्या प्रत्येक ग्राहकाला डेटा आणि जिओ फोनच्या माध्यमातून सक्षम करण्याचा जिओ चळवळीचा उद्देश असल्याचे मत रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी यांनी व्यक्त केले. 

 जिओफोन वापरणाऱ्या लाखो ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी आम्ही उत्सुक होतो, या कराराच्या माध्यमातून आम्ही अतिशय उत्तम सेवा देणार आहोत असे फेसबुकच्या मोबाईल पार्टनरशीपचे उपाध्यक्ष फ्रान्सिस्को वेरेला यांनी सांगितले. 

Web Title: Reliance Jio Phone users to get Facebook app