देशात फक्त रिलायन्सलाच 'अच्छे दिन'; जिओच्या नफ्यात 183 टक्क्यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 July 2020

चालू आर्थिक वर्षाची पहिली तिमाही सर्व उद्योगांना अतिशय कठीण गेलेली असली तरी, रिलायन्स इंडस्ट्रीजने मात्र या काळात चमकदार कामगिरी नोंदविली आहे.

मुंबई : चालू आर्थिक वर्षाची पहिली तिमाही सर्व उद्योगांना अतिशय कठीण गेलेली असली तरी, रिलायन्स इंडस्ट्रीजने मात्र या काळात चमकदार कामगिरी नोंदविली आहे. "रिलायन्स जिओ'ने याच काळात आपल्या नफ्यात 183 टक्‍क्‍यांची वार्षिक वाढ नोंदविली आहे. 

तग धरून राहिलेला तेल उद्योग, "जिओ'च्या रुपाने डिडिटल सेवांची वाढती लोकप्रियता आणि रिटेल उद्योगाची भक्कम प्रगती यांच्या जोरावर रिलायन्स इंडस्ट्रीजने पहिल्या तिमाहीत एकूण 13 हजार 248 कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. वार्षिक तत्वावर ही वाढ 30.6 टक्के आहे. "रिलायन्स जिओ'ने याच काळात आपल्या नफ्यात 183 टक्‍क्‍यांची वार्षिक वाढ नोंदविली. त्याचा नफा 2520 कोटी रुपयांवर पोचला.

हे वाचा - २८९२ कोटींच्या कर्जापायी अनिल अंबानींनी गमावले मुख्यालय; येस बँकेने केली कारवाई

"जिओ'चा प्रति वापरकर्त्यामागचा सरासरी महसूल (एआरपीयू) 7.4 टक्‍क्‍यांनी वाढून रु. 140.3 रुपयांवर पोचला आहे. बाजाराच्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी कंपनीने केली आहे. "रिलायन्स'च्या "जिओ' प्लॅटफॉर्ममध्ये "फेसबुक'सह जगातील आघाडीच्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली. या तिमाहीत 1,52,056 कोटी रुपये उभे राहिले.

हे वाचा - सोन्यात गुंतवणूक करायची हीच ती वेळ; वाचा सविस्तर बातमी​

त्याआधी ब्रिटीश पेट्रोलियमची गुंतवणूक आणि राईट्‌स इश्‍यूच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या 53,124 कोटी रुपयांमुळे कंपनी कर्जमुक्त झाली आहे. रिलायन्स ही आता जगातील आघाडीच्या 50 मूल्यवान कंपन्यांमध्ये सहभागी झाली असून, तिचे बाजारी भांडवलीमूल्य 13.92 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोचले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reliance jio profit soars 183 percent