रिलायन्स इंडस्ट्रीज बनली 'किंंग'; बाजारभांडवल 7.12 लाख कोटींवर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज (आरआयएल) पुन्हा एकदा टीसीएसला मागे सारत सर्वाधिक बाजारभांडवल असणारी देशातील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. मुकेश अंबानी आरआयएलचे बाजारभांडवल 7 लाख 12 हजार 386.67 कोटी रुपयांवर पोचले आहे. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) बाजारभांडवल सध्याच्या शेअरच्या किंमतीनुसार 7 लाख 01 हजार 996.13 कोटी रुपये आहे. 

आज मुंबई शेअर बाजारात आरआयएलचा शेअर 2.62 टक्क्यांनी म्हणजेच 28.75 रुपयांनी वधारला असून तो 1125.65  रुपयांवर व्यवहार करतो आहे. आरआयएलच्या शेअरने आज दिवसभरात 1128.50 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. तर टीसीएसचा शेअर आज किरकोळ वाढीसह 1880 रुपयांवर व्यवहार करतो आहे. 

बाजारभांडवलाच्या बाबतीत आरआयएल आणि टीसीएसच्या शेअरमध्ये चढाओढ सुरु आहे. 31 ऑगस्टरोजी आरआयएलला मागे टाकत टीसीएस सर्वाधिक बाजारभांडवल असलेली कंपनी ठरली होती. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance pips TCS to become most-valued firm