esakal | 7-Eleven | रिलायन्स रिटेल 7-Eleven स्टोअर्स लॉन्च करणार
sakal

बोलून बातमी शोधा

Reliance market cap inches closer to ₹10 lakh crore mark

रिलायन्स रिटेल 7-Eleven स्टोअर्स लॉन्च करणार, मुंबईतून सुरुवात

sakal_logo
By
ओमकार वाबळे

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने भारतातील रिटेल मार्केटमध्ये पकड घट्ट करण्यासाठी आणखी एक पाऊल उचललं आहे. रिलायन्स रिटेल कंपनीने 7-Eleven Inc सह फ्रँचायझी करार केला आहे. याआधी रिलायन्सचा अमेरिकेतील प्रख्यात फ्युचर रिटेल लिमिटेडशी करार होता. तो संपवल्यानंतर काही दिवसांनी भारतात सर्व्हिस स्टोअर्स सुरू करण्यासाठी रिलायन्सने पावलं उचलली आहेत.

याची सुरुवात देशाची आर्थिक राजधानी मुंबईतन होणार आहे. या ठिकाणी 9 ऑक्टोबरला पहिलं 7-Eleven स्टोअर सुरू करणार असल्याची माहिती रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने दिली आहे.

फ्युचर रिटेलर्स आणि 7-Eleven या कंपन्यांमध्ये सुरुवातील करार करण्यात आला होता. यानुसार भारतात चोवीस तास सेवा पुरवण्यावर भर देण्यात आला होता. सुविधा स्टोअर्स विकसित आणि संचालित करण्यासाठी 7-Eleven Incकंपनीसह करार झाला होता. मात्र, तो संपुष्टात आला. कारण दोन्ही कंपन्या स्टोअर उघडण्याचे आणि फ्रँचायझी-फी पेमेंटचे लक्ष्य पूर्ण करू शकल्या नाहीत.

फ्यूचर ग्रुपने त्यांची मालमत्ता अब्जाधीश मुकेश अंबानींच्या रिलायन्सला विकण्यास सहमती दर्शविली होती. पण अॅमेझॉन डॉट कॉमने आव्हान दिल्यानंतर या करारात अडथळे निर्माण झाले. आता हा करार पूर्ण न झाल्यास येणाऱ्या काळात फ्युचरला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, असं कंपनीने म्हटलं आहे. त्यानंतर आता रिलायन्स आणि 7-Eleven या कंपन्यांमध्ये करार होत असून भारतातील रिटेल मर्केटमध्ये रिलायन्सचे समभाग आणखी वाढणार आहेत.

loading image
go to top