Renault ची नवीन Duster आली

Renault ची नवीन Duster आली

नवी दिल्ली: Renault ची नवी Duster अत्याधुनिक 25 फीचर्ससह लाँच झाली आहे. भारतीय रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे आव्हान पेलण्याची क्षमता असलेल्या सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. नऊ विविध व्हेरिअंट्समध्ये ही फेसलिफ्ट डस्टर एसयूव्ही भारतीय बाजारात उतरवण्यात आली असून यातील 3 पेट्रोल आणि 6 डिझेल इंजिन व्हेरिअंट आहे. डस्टरचे दमदार बाह्यरूप, अप्रतिम इंटेरिअर आणि आधुनिक सुविधा यातून रेनोची एसयूव्ही विभागात नवे मापदंड प्रस्तापित करेल. नव्या फेसलिफ्ट डस्टरची किंमत 7.99 लाख ते 12.50 लाख (एक्स शोरुम) रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे.


आयकॉनिक आणि दमदार लूक 
जागतिक दर्जाच्या स्टायलिंग वैशिष्ट्यांची जोड मिळालेल्या डिझाइनमुळे रेनो डस्टर भारतीय हवामान, परिस्थिती आणि ग्राहकांच्या प्राधान्य क्रमानुसार  अगदी योग्य ठरते. नवे ट्राय-विंग फूल क्रोम ग्रील, दमदार स्कीड प्लेट्स असलेले नव्या दुहेरी रंगातील फ्रंट बंपर, दमदार आणि रूंद हूडला अगदी साजेसे असे एलईडी डीआरएल असलेले नवे सिग्नेचर प्रोजेक्टर हेडलँप्स यामुळे नवी रेनो डस्टर अधिकच उठून दिसते. R16 एव्हरेस्ट डायमंड कट अलॉय व्हील्समुळे  डस्टरचे दमदार रूप आणखीच खुलून येते. नव्या डस्टरमध्ये 205 मिमी. असा उच्च ग्राऊंड क्लीअरन्स आहे. तर, एडब्ल्यूडी या प्रकारात 210 मिमी.चा ग्राऊंड क्लीअरन्स आणि हाय अप्रोच आणि डीपार्चर अँगल्स असल्याने विविध परिस्थितीतील भारतीय रस्ते आणि ग्राहकांच्या बहुविध गरजा यात पूर्ण होतात.  रूफ रेल्स, गाडीच्या रंगांचे ओआरव्हीएम, मॅट ब्लॅक टेलगेट एम्बेलिशर आणि वॉटरफॉल एलईडी टेल लँप्स यामुळे या गाडीचा दमदार लुक अधिक उठून दिसतो. नव्या प्रकारात गाडीच्या बाह्य रंगांमध्ये ग्राहकांना दोन रंगांचा पर्याय देण्यात आला आहे – ‘कॅस्पियन ब्ल्यू’ आणि ‘महोगनी ब्राऊन’.

 आरामदायीपणा
इंटेरियर अतिशय आरामदायी बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इंटेरियरमध्ये मिडनाइट ब्लॅक रंगामुळे डस्टरच्या केबिनला अगदी नवे रूप मिळाले आहे. स्पीड लिमिटरसह क्रूझ कंट्रोलही देण्यात आले आहे. डॅशबोर्डसह दुहेरी रंगातील सेंटर फेशिआ आणि डोअर ट्रिम्स यामुळे अंतर्गत सजावटीतील स्टायलिंगमध्ये भर पडते. शिवाय, मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्लेसह आइस ब्ल्यू ग्राफिक इन्स्ट्रूमेंट क्लस्टरची जोड देण्यात आली आहे.  17.64 सेमी टचस्क्रीन मीडियाएनएव्ही इव्होल्युशनमुळे या गाडीत बसण्याचा अनुभव अत्यंत सुंदर आणि गुंतवून ठेवणारा बनतो. या नव्या प्रणालीत अॅपलकारप्ले, अँड्रॉईड ऑटो, व्हॉईस रेकग्निशन आणि इको गाइड सुविधा आहेत.  नव्या डस्टरमध्ये 4 स्पीकर्ससह ARKAMYS प्रणाली आणि अधिक चांगल्या संगीतानुभवासाठी 2 फ्रंट टि्वटर्स आहेत. नव्या रेनो डस्टरमध्ये पूर्णपणे स्वयंचलित क्लायमेट कंट्रोल प्रणाली आहे. यामुळे, केबिनमधील हवेचा गारवा आपोआप नियंत्रित केला जातो आणि गाडीत अधिकाधिक आरामदायी तापमान राखले जाण्याची खात्री आहे. 

 सुरक्षा वैशिष्ट्ये
नवी रेनो डस्टर फ्रंट, साइड आणि पादचाऱ्यांसाठीच्या बीएनसीएपी नियमांना अनुसरून तयार करण्यात आली आहे आणि भारतीय सुरक्षा नियमांची यात पूर्तता करण्यात आली आहे. यात इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशनसह (ईबीडी) अँटीलॉक-ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), चालक आणि प्रवाशांसाठी एअरबॅग्स, रीअर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रीमाइंडर आणि स्पीड अलर्ट यासारखी सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. ही सर्व वैशिष्ट्ये नव्या रेनो डस्टरच्या सर्व व्हर्जन्समध्ये उपब्लध आहेत. रीव्हर्स पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ईएसपी) आणि हिल-स्टार्ट असिस्ट यामुळे डस्टरच्या एसयूव्ही क्षमता अधिक चांगली होते नव्या डस्टरमध्ये 38 विविध प्रकारच्या नाविन्यपूर्ण अॅक्सेसरीज आहेत. ज्यामुळे, या गाडीचे एसयूव्ही रूप अधिक उठून दिसते

रेनो डस्टर न्यू एडिशन – 2019 : ड्राइव्हट्रेन
 1.5 ली पेट्रोल आणि 1.5 ली. डीसीआय डिझेल इंजिनमुळे या गाडीत अदि्वतीय असा परफॉर्मन्स मिळतो. ही दोन्ही इंजिन्स रीस्पॉन्सिव्ह आणि इंधन सक्षम आहेत. पेट्रोल इंजिनमध्ये अतुलनीय अशी 106 पीएस ऊर्जा आणि 142 Nm कमाल टॉर्क मिळतो.  एक्स-टॉनिक सीव्हीटी गीअरशिफ्ट असलेले 1.5 ली. पेट्रोल इंजिन सर्व प्रकारच्या रस्त्यांवर उत्तम मायलेजसोबतच उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. रेनो डस्टर पेट्रोल 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे.

नव्या रेनो डस्टरमध्ये 1.5 ली. डिझेल इंजिन आहे आणि यात दोन पॉवर आऊटपूटचा पर्याय आहे : 245 Nm आणि 200 Nm सह अनुक्रमे 110 पीएस आणि 85 पीएस. दमदार 110 पीएस प्रकारात इंजिनच्या आऊटपूटला साजेसे अशा गीअररेशिओसह 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. 85 पीएस प्रकारात स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. बाह्य रंग दोन नवे पर्याय – कॅस्पियन ब्ल्यू आणि महोगनी ब्राऊन


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com