Repco Home Finance Share : चार महिन्यात 130 टक्के तेजी, आणखी वाढीचा तज्ज्ञांना विश्वास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Repco Home Finance Share

Repco Home Finance Share : चार महिन्यात 130 टक्के तेजी, आणखी वाढीचा तज्ज्ञांना विश्वास

Repco Home Finance Share : रेपको होम फायनान्सच्या शेअर्सने त्याच्या गुंतवणुकदारांना कायमच चांगला परतावा दिला आहे. आता तर सप्टेंबर 2022 तिमाहीच्या दमदार निकालांमुळे, त्याचे शेअर्स सोमवारी जवळपास 10 टक्क्यांनी वाढून 260.55 रुपयांपर्यंत पोहोचले.

सुमारे साडेचार महिन्यांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 130 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय या शेअर्समध्ये आणखी 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता बाजार तज्ज्ञांनी वर्तवली आहे. रेपको होम फायनान्सची मार्केट कॅप 1,630 आहे.

हेही वाचा: Share market: आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

रेपको होम फायनान्स कंपनीने सप्टेंबर तिमाहीत 71.2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. ही वाढ अंदाजापेक्षा जास्त होती असे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या विश्लेषकांचं म्हणणं आहे. क्रेडिट कॉस्ट देखील 188.8 कोटी होती, जी ब्रोकरेज फर्मच्या अंदाजापेक्षा निम्मी होती.

हेही वाचा: Share Market Tips : एका वर्षात तिप्पट परतावा, 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल...

हाउसिंग फायनान्स कंपनीचे नवीन एमडी आणि सीईओ के स्वामीनाथन यांची ग्रोथ स्ट्रॅटर्जी चांगली काम करत असल्याचे ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. सध्या हे शेअर्स कमी किंमतीत अर्थात 260 रुपयांना मिळत आहेत. ब्रोकरेज फर्मने यावर 470 रुपयांचे टारगेट दिले आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा हे सुमारे 80 टक्क्यांनी जास्त आहे.

हेही वाचा: Share Market: बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म ?

रेप्को होम फायनान्सचे मुख्यालय चेन्नईत आहे. मार्च 2022 पर्यंत तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, झारखंड, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि पुद्दुचेरीत त्यांच्या 155 शाखा आणि 24 सॅटेलाइट सेंटर्स आहेत.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

टॅग्स :Share Market