Share Market Tips : एका वर्षात तिप्पट परतावा, 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल...

शेअर मार्केटमध्ये दर्जेदार शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही.
shares
sharesgoogle

शेअर मार्केटमध्ये दर्जेदार शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे नीट विचार आणि अभ्यास करुन शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे गरजेचे आहे. कारण जसा फायदा होतो तसेच नुकसानही होते. लाखोंचा फंड शुन्यावर येऊ शकतो. त्यामुळेच शेअर मार्केट तज्ज्ञांनी सांगितलेल्या टिप्सच्या आधारावर आम्ही तुम्हाला कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवायचे याचा सल्ला देत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगणार आहोत ज्याने गुंतवणूकदारांचे पैसे वर्षभरात तिप्पट केले. हा शेअर फारसा महाग नाही, पण तरी याने गुंतवणुकदारांना दमदार परतावा दिला आहे.

हेही वाचा : मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

investment
investmentsakal
shares
Investment : सुकन्या समृद्धी योजनेत झाले आहेत हे बदल; माहिती घेऊन गुंतवा पैसे

आम्ही फिलाटेक्स फॅशन्स (Filatex Fashions) या स्टॉकबाबत बोलत आहोत. शुक्रवारी बीएसईवर फिलाटेक्सचा शेअर 3 टक्क्यांनी वाढून 17.90 रुपयांवर बंद झाला. या शेअरने आदल्या दिवशी 18.15 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला होता, जो 5% अपर सर्किट होता. फिलाटेक्स फॅशन्स हा शेअर 4 नोव्हेंबर 2021 रोजी बीएसईवर लिस्ट झाला होता. त्यावेळी त्याची किंमत अवघी 4 रुपये होती.

shares
JK Cement : या सिमेंट कंपनीने गुंतवणूकदारांना केले कोट्यधीश, आणखी वाढ अपेक्षित...

एखाद्या गुंतवणूकदाराने हा स्टॉक 4 नोव्हेंबर 2021 रोजी विकत घेतला असता किंवा त्यावेळी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आज 4 लाख रुपयांहून अधिक परतावा मिळाला असता. गुंतवणूकदारांना तीन लाख रुपयांपेक्षा जास्त नफा झाला असता.

शेअरमध्ये आणखी वाढ अपेक्षित

फिलाटेक्स फॅशन्सच्या शेअरमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 3 नोव्हेंबरला श्रीलंकास्थित इसाबेला प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 51% चे बहुसंख्य भागभांडवल विकत घेण्याची ऑफर दिल्यानंतर फिलाटेक्स फॅशन्स स्टॉकमध्ये तेजी येत आहे. या स्टॉकमध्ये अजूनही वाढ होण्याची चिन्हे दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com