सप्टेंबर 2021 पर्यंत बँकांचा NPA वाढण्याची शक्यता; RBIने प्रसिद्ध केला रिपोर्ट

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 12 January 2021

पुढील आर्थिक वर्षाच्या (मार्च 2021- फेब्रुवारी 2022) सप्टेंबर महिन्यापर्यंत बँकांची बुडीत रक्कम (एनपीए-नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स) वाढून 13.5 टक्क्यांवर जाऊ शकते.

पुढील आर्थिक वर्षाच्या (मार्च 2021- फेब्रुवारी 2022) सप्टेंबर महिन्यापर्यंत बँकांची बुडीत रक्कम (एनपीए-नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स) वाढून 13.5 टक्क्यांवर जाऊ शकते. चालू आर्थिक वर्षाच्या 2020 सप्टेंबर महिन्यात हीच बुडीत रक्कम 7.5 टक्के होती. नुकतेच जाहीर झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आर्थिक स्थिरता अहवालात (एफएसआर) बँकांच्या एनपीएत मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय आर्थिक परिस्थितीत अजून घसरण झाल्यास एनपीएचे प्रमाण 14.8 टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. 

SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट, ATM वापरताना या 9 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं

आरबीआयच्या आर्थिक स्थिरतेच्या अहवालानुसार, आर्थिक स्थितीच्या दबाव परिस्थितीत अनुसूचित वाणिज्य बँकांचे सकल एनपीए 2020 च्या सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत जे 7.5 टक्के होते ते वाढून नवीन आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात 13.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तविली आहे. त्याच वेळी, खाजगी क्षेत्रातील बँकांचे सकल एनपीए 4.6 टक्क्यांनी वाढून 7.9 टक्के आणि विदेशी बँकांचे सकल एनपीए 2.5 टक्क्यांनी वाढून 5.4 टक्के होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने दिला दिलासा

तसेच आर्थिक वातावरण आणखी बिकट झाल्यास सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी बँका आणि विदेशी बँकांचे सकल एनपीए सप्टेंबर 2021 पर्यंत अनुक्रमे 17.6 टक्के, 8.8 टक्के आणि 5.5 टक्क्यांपर्यंत वाढण्याची चिंता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, एकूण एनपीए रेशोचा हा अंदाज बँकांच्या पोर्टफोलिओच्या मूल्यात देखील घट होण्याचे संकेत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Report released by RBI mentioned that NPAs of banks to can increase by September 2021