RBI चा दणका; सर्व प्रकारची कर्जे पुन्हा महागली!

गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँकेने तातडीने रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर इतर बँकांनी कर्जाचे दर वाढवले होते.
Reserve bank of India
Reserve bank of IndiaSakal
Updated on

भारतीय रिझर्व बँकेने आज आपलं नवं पतधोरण जाहीर केलं आहे. यामध्ये बँकेने पुन्हा एकदा रेपो दरात ०.५० टक्क्यांची वाढ केली आहे. महिन्याभरातली ही दुसरी वाढ आहे. यामुळे आता रिझर्व बँकेचा रेपो दर ४.९० टक्के झाला आहे.

Reserve bank of India
HDFC चा ग्राहकांना झटका; एका निर्णयामुळे सर्वच कर्जांचे हप्ते वाढणार

रिझर्व बँकेने रेपो दरात वाढ केल्याने आता सर्वसामान्यांसाठी कर्ज महाग होणार आहेत. कारण आता बँकांच्या कर्जाची किंमत वाढणार आहे. रेपो रेट हा असा दर आहे, ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेतात. हा दर वाढल्याने आता बँकांना जास्त दराने कर्ज मिळणार आहे. त्यामुळे बँका ग्राहकांकडून चढ्या दराने व्याज घेणार आहेत.

Reserve bank of India
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणातील 'रेपो रेट' म्हणजे काय?

यापूर्वीही रिझर्व बँकेने आपल्या दरामध्ये ०.४० टक्क्यांची वाढ केली होती. रेपो दरात यापुढेही आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. चलनवाढीचा दर समाधानकारक पातळीवर आणण्याच्या दबावामुळे पॉलिसी रेट वाढवण्याची शक्यताही रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com