आता कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार; RBIचा नवा नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम जारी केला आहे.
ATM Card
ATM CardSakal

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) कार्डशिवाय कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम जारी केला आहे. आता ग्राहक कोणत्याही एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढू शकतात. या संदर्भात NPCI ला UPI इंटिग्रेशनच्या सूचना मिळाल्या आहेत.
एटीएम (ATM) कार्डवर आकारले जाणारे शुल्क तेच राहतील, त्यावर कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. याशिवाय एटीएममधून कार्डाशिवाय पैसे काढण्याची मर्यादाही कायम राहणार आहे. दुसरीकडे, जर ग्राहकांनी कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढले, तर त्यांना एटीएममध्ये भरलेल्या शुल्काव्यतिरिक्त कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. सध्या विनाकार्ड पैसे काढण्याची सुविधा फक्त स्वतःच्या ग्राहकांपुरती मर्यादित आहे.

ATM Card
या स्मॉलकॅप स्टॉकचा 1 वर्षात 1846% परतावा, रेकॉर्ड डेटपूर्वी अपर सर्किटला धडक

यामागील RBI चा उद्देश काय ?
बँक दुसऱ्या बँकेच्या ग्राहकांना ही ही सुविधा दिली जाणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणीही होणार आहे.

ग्राहकांना काय मिळणार ?
-
पैसे काढण्यासाठी नेहमी कार्डची गरज भासणार नाही.
-कार्ड क्लोनिंग, कार्ड स्किमिंग आणि इतर बँक फसवणूक कमी होईल.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com