महसूल वाढल्यास जीएसटी कपात शक्‍य - पीयूष गोयल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली - ‘जीएसटी’ करधारक आणि कर महसूल वाढल्यास नजीकच्या काळात आणखी काही वस्तूंवरील ‘जीएसटी’मध्ये कपात करणे शक्‍य असल्याचे सूतोवाच अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी केले. जीएसटीमधील सुधारणांसाठीची चार विधेयके गोयल यांनी लोकसभेत मांडली. त्या वेळी ते बोलत होते. ग्राहकांवरील कराचा बोझा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे गोयल यांनी सांगितले. जीएसटी कायद्यातील सुधारणांसाठी सेंट्रल जीएसटी सुधारणा विधेयक, इंटिग्रेटेड जीएसटी सुधारणा विधेयक, जीएसटी (राज्यांसाठी कॉम्पेसेशन) सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेशांकरिता जीएसटी सुधारणा विधेयक ही चार विधेयके संसदेत सादर केली.

नवी दिल्ली - ‘जीएसटी’ करधारक आणि कर महसूल वाढल्यास नजीकच्या काळात आणखी काही वस्तूंवरील ‘जीएसटी’मध्ये कपात करणे शक्‍य असल्याचे सूतोवाच अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी केले. जीएसटीमधील सुधारणांसाठीची चार विधेयके गोयल यांनी लोकसभेत मांडली. त्या वेळी ते बोलत होते. ग्राहकांवरील कराचा बोझा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे गोयल यांनी सांगितले. जीएसटी कायद्यातील सुधारणांसाठी सेंट्रल जीएसटी सुधारणा विधेयक, इंटिग्रेटेड जीएसटी सुधारणा विधेयक, जीएसटी (राज्यांसाठी कॉम्पेसेशन) सुधारणा विधेयक आणि केंद्रशासित प्रदेशांकरिता जीएसटी सुधारणा विधेयक ही चार विधेयके संसदेत सादर केली. त्यांना मंजुरी देण्यात आली आहे.

Web Title: Revenue increases the GST reduction possible says Piyush Goyal