'जिओ' करणार देसी धमाका!

'जिओ' करणार देसी धमाका!

मुंबई: सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारे इंटरनेट आणि कॉलिंग दर कमी करून देशातील इतर टेलिफोन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कंबरडे मोडल्यानंतर जिओ ने आपला मोर्चा अँड्रॉइड आधारित मोबाईल अँप्लिकेशन्स कडे वळविला आहे. जिओसिनेमा आणि जिओ टीव्हीच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनवर ऑनलाईन मूव्ही आणि लाईव्ह टीव्हीचा पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर जिओने आता आपले लक्ष 'ब्राउजर'वर केंद्रित केले आहे. रिलायन्सने भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन JioBrowser तयार केला आहे. हा पहिला भारतीय वेब ब्राऊझर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 

गूगल प्ले स्टोरमध्ये असलेला 4.8MB साईझचा जिओ ब्राउजर इतर ब्राऊझर्सच्या तुलनेत साईझने कमी आणि अतिशय वेगवान आहे. यामुळे अधिक मेमरी स्टोरेजचीही आवश्यकताही नाही. 4.4 रेटिंग सहित इंटरनेट प्रेमींच्या पसंतीस पडलेल्या JioBrowserला आतापर्यंत १० लाख जणांनी डाऊनलोड केले आहे.

 ब्राउजरची वैशिष्ट्ये –

– मराठी,हिंदी, गुजराती, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि बंगाली या ८ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध.  
– युसी ब्राउजर किंवा युसी न्यूज प्रमाणे व्हिडिओ आणि ताज्या बातम्यांचा खजिना. तसेच स्थानिक बातम्यांचा वेगळा सेक्शन करू शकता
-- जियो ब्राऊजरमध्ये डिफॉल्ट पसंतीचा टॅब देखील आहे जो मायजियो, बुक माय शो,ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि एनडीटीव्ही सारख्या वेबसाइट्स उपलब्ध 
    आहेत.
– एखाद्या वेबसाईटवर सरळ जाता येईल
– मित्रांसोबत व्हिडीओ आणि फोटो शेअर करू शकता.
– हिस्ट्री पेजवर जाऊन आपल्या डाऊनलोड फाइल्सचे नियंत्रण करता येणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com