रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारभांडवल रु.4 लाख कोटींवर

वृत्तसंस्था
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (आरआयएल) शेअरमध्ये तेजी कायम आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष यांनी रिलायन्स जियोच्या इंटरनेट सेवांवर शुल्क आकारण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरने उसळी घेतली. आज (सोमवार) मुंबई शेअर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर इंट्राडे व्यवहारात 1256.80 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे.

जून 2009 नंतर प्रथमच कंपनीच्या शेअरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. परिणामी गेल्या चार सत्रांमध्ये कंपनीचे बाजारभांडवल रु.57,336 हजार कोटींनी वधारले आहे. सध्या कंपनीचे एकूण बाजारभांडवल रु.405,629 कोटींवर पोचले आहे. 18 जानवेरी 2008 नंतर प्रथमच कंपनीचे बाजारभांडवल चार लाख कोटींच्या पार पोचले आहे. त्यावेळी कंपनीचे बाजारभांडवल रु.406,949 कोटींवर पोचले होते.

सध्या मुंबई शेअर बाजारात रिलायन्सचा शेअर 1240.65 रुपयांवर व्यवहार करत असून तो 58.05 रुपयांनी म्हणजेच 4.91 टक्क्यांनी वधारला आहे. सध्याच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.402,887.68 कोटींचे बाजारभांडवल आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 888.50 रुपयांची नीचांकी तर 1256.80 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

Web Title: RIL market cap crosses Rs4 trillion