"आत्मनिर्भर पोर्टफोलिओ'

"आत्मनिर्भर पोर्टफोलिओ'

पंतप्रधान आत्मनिर्भरतेविषयी बोलत होते. या ऑनलाइन संवादात सहभागी असलेल्या संजयने त्यालाही बाजारातील सर्व परिस्थितींमध्ये चालू शकेल असा आत्मनिर्भर पोर्टफोलिओ करता येईल का, अशी विचारणा केली. हे ऐकून मी स्मित केले. कारण मी याविषयी गेली अनेक वर्ष थेट ग्राहकांशी संवाद साधताना आणि माझ्या स्तंभातून सांगत आलो आहे. पूर्ण आयुष्यासाठी आणि बाजारातील सर्व परिस्थितीवर मात करणारा पोर्टफोलिओ तयार करण्याची कल्पना मी समजावून सांगितली. 

"आत्मनिर्भर पोर्टफोलिओ' म्हणजे काय?
सर्व परिस्थितीमध्ये काम करू शकेल, असा पोर्टफोलिओ आत्मनिर्भर म्हणता येईल. वर्षानुवर्षे एकच "अॅसेट क्लास' इतर "अॅसेट क्लास'पेक्षा चांगली कामगिरी सातत्याने करीत आला आहे, हे सिद्ध झालेले नाही. आज चांगली कामगिरी करणारा "अॅसेट क्लास' भविष्यात वाईटही कामगिरी करू शकतो. "अॅसेट क्लास' चांगली कामगिरी करीत नसताना खरेदी करणे आणि तो वाढल्यानंतर विकणे हे वास्तविक पाहता अशक्य ठरते. प्रत्यक्षात असे नियोजन करणे शक्य होत नाही. त्यामुळे तुम्हाला "आत्मनिर्भर पोर्टफोलिओ'ची गरज भासते. हा "पोर्टफोलिओ' या समस्येवर मात करतो. अशावेळी तुमच्यासमोर वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांमध्ये गुंतवणूक करण्याचा महत्त्वाचा मुद्दा येतो. वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांचा समावेश असलेला पोर्टफोलिओ हा बाजारातील धक्के पचवण्यासोबत तुमच्या गुंतवणुकीचे संरक्षण करतो.
यावर संजय मला म्हणाला," वॉरेन बफे आणि इतर गुंतवणूक गुरूंनी दिलेल्या सल्ल्याच्या अगदी उलट हे आहे."

त्याने बफे यांचे वेगवेगळ्या गुंतवणुक प्रकारांमध्ये गुंतवणूक करण्याबाबतचे वचन मला ऐकवले. ते म्हणतात, 'वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांमध्ये गुंतवणूक करणे हे आपले दुर्लक्षापासून संरक्षण करते. आपण काय करतोय हे कळणाऱ्या लोकांसाठी ही चांगली कल्पना नाही.' संजयने मला पुढे विचारले की, तो वेगवेगळ्या "अॅसेट क्लास'मध्ये गुंतवणूक करून आणि कमी जोखीम स्वीकारून कशा प्रकारे चांगली संपत्ती निर्माण करू शकतो. 

वेगवेगळ्या गुंतवणूक प्रकारांमध्ये गुंतवणूक करण्याची तुम्हाला गरज आहे पण वॉरेन बफेंना नाही...

सर्वप्रथम मी बफेंसारख्या व्यक्तीच्या ज्ञानाबद्दल शंका उपस्थित करीत नाही. मी संजयला सांगितले की, वॉरेन बफे हे शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत बोलत आहेत. याचबरोबर ते अशा शेअर बाजार गुंतवणूकदाराबाबत बोलत आहेत, ज्याच्याकडे त्याच्या गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची फौज आहे. बफे हे केवळ शेअर खरेदी करीत नाहीत, तर ते संपूर्ण कंपनीही खरेदी करू शकतात. 

मी संजयला सांगितले की, आपल्यासारख्या व्यक्तीने गुंतवणूक करणे खूप वेगळे असते. बफे ज्या व्यवसायात आहेत त्याच व्यवसायात तुम्ही असाल तर त्यांचा मार्ग अंधपणे स्वीकारला तरी चालेल. रिटेल गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला तुमच्या गुंतवणूकीचे दैनंदिन व्यवस्थापन आणि बाजारातल्या घडामोडींनुसार तासनतास त्यावर लक्ष ठेवून त्यानुसार निर्णय घेणे शक्य होत नाही. तुम्हाला तुमची नोकरी अथवा व्यवसाय यावर लक्ष केंद्रित करून तुमचा पैसा कशा पद्धतीने काम करेल हे पहावे लागते. तुम्ही कमावलेला पैसा वेगवेगळ्या "अॅसेट क्लास'मध्ये जातो. जेव्हा बफे गुंतवणुकीबद्दल बोलतात, त्यावेळी ते नोकरी अथवा व्यवसायबद्दल असते. हे मी नेहमी सांगतो.

रिटेल गुंतवणूकदार म्हणून तुम्हीच तुमचा स्टॉक असता. तुमची नोकरी अथवा व्यवसाय यातील गुंतवणुकीतून मिळणारा परतावा चांगला परतावा ठरत असतो. 

इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आत्मनिर्भर पोर्टफोलिओ कसा तयार करावा?
तुम्ही "ड्रॉइंग बोर्ड' घेऊन बसा आणि एक "ब्लू प्रिंट' तयार करा. तुमचे उत्पन्न, खर्च, "फायनान्शिअल गोल', दायित्व, "टाईमलाईन' आणि एकूणच "रिस्क प्रोफाईल' याचा यासाठी आधार घ्या. एकदा हे पूर्ण झाल्यानंतर तुमचे "फायनान्शिअल गोल' गाठण्यासाठी कोणते "इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट' योग्य आहे याचा निर्णय घ्या. 

उदा. तुमच्या सोनेरी वर्षांची काळजी घेण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी पैसा लागेल. तुमची निवृत्तीची वेळ एका ठराविक मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. तुम्ही लवकर निवृत्त होण्याचा विचार केला असेल तर नियोजन करणे आणखी महत्त्वाचे ठरते. कारण प्रत्यक्ष उत्पन्नाच्या स्रोताशिवाय आणखी काही वर्षे तुम्हाला घालवावी लागणार असतात. सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीतही मुलांचे शिक्षण अथवा लग्न या बाबी पुढे ढकलता येत नाहीत. याच मुळे बाजारातील कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करू शकेल, असे "अॅसेट अलोकेशन' करण्याची गरज असते.  अशा प्रकारच्या "पोर्टफोलिओ'मध्ये संरक्षण हा अतिशय महत्वाचा भाग असतो. "हेल्थ इन्शुरन्स' आणि "लाइफ इन्शुरन्स' हे दोन घटक तुमच्या 'पोर्टफोलिओ'मध्ये महत्त्वाचे ठरतात आणि त्याला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बनवतात. 

आदर्श "अॅसेट अलोकेशन' म्हणजे काय? 
 सर्वांसाठी सारखेच "अॅसेट अलोकेशन' करता येत नाही. कारण व्यक्तिपरत्वे "फायनान्शिअल गोल' आणि "रिस्क प्रोफाइल' बदलत जातात. प्रत्येक "अॅसेट क्लास'ला एक जोखीम असते आणि तुमच्या कोणत्याही गुंतवणुकीला बाजारातील जोखीम नेहमीच राहते. "इक्विटी'मध्ये गुंतवणूकदाराला दीर्घकालीन फायदे मिळतात. सध्याच्या काळात रोख रक्कम अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यामुळे रोख रक्कम, "इक्विटी म्युच्युअल फंड", "पीएफ', "पीपीएफ', "रिअल इस्टेट', सोने, "एनपीएस', आणि "डायरेक्ट स्टॉक' यांचे चांगले मिश्रण तयार करून त्याचे व्यवस्थापन करा. या प्रत्येक प्रकारातील गुंतवणुकीची टक्केवारी तुमचे "फायनान्शिअल गोल' आणि "रिस्क प्रोफाइल' यावर अवलंबून असेल. 

तुम्ही तरुण असाल आणि तुमच्याकडे अजून काही कालावधी असेल तर "इक्विटी' गुंतवणुकीकडे वळा. तुम्ही घर घेतले असेल तर तुमचा बऱ्यापैकी पैसा "ईएमआय'वर खर्च होतो. त्यामुळे "पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग' पाहून त्यात काय योग्य बसते याचा निर्णय घ्या. यासाठी इथे निश्चित आकडेवारी सांगता येत नाही.कारण सगळ्यांनाच एकच "प्लॅन' योग्य ठरत नाही.

 सध्याच्या संकटाच्या काळात वारंवार विचारले जाणारे दोन प्रश्न संजयनेही मला विचारले. ते म्हणजे, सोने आणि फार्मा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी का? सध्या सोने चांगली कामगिरी करत आहे. कारण नेहमीच ते सुरक्षित पर्याय राहिले आहे तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर आत्ताचे "अॅसेट अलोकेशन' पहा. एकूण "पोर्टफोलिओ'च्या दहा टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक सोन्यात करू नका. सगळेजण खरेदी करीत आहेत म्हणून तुम्हीही खरेदी करू नये. याच प्रकारे फार्माचाही विचार करा. एक लक्षात घ्या, हा "सेक्टरल फंड' आहे आणि मागील पाच वर्षांत त्याने कोणताही परतावा दिला नाही. सध्या हे क्षेत्र चांगला परतावा देत असले तरी ते किती काळ याचप्रकारे परतावा देऊ शकेल, हे आपल्याला माहिती नाही. म्हणूम सध्या "सेक्टरल फंड' टाळावेत. 

"इक्विटी' आणि "म्युच्युअल फंड अलोकेशन' कसे ठरवावे? 
आपण अनेक वर्ष पाहत आलो आहोत की, अनेक गुंतवणूकदार योग्य "फायनान्शिअल प्लॅनिंग' आणि "अॅसेट लोकेशन' करून गुंतवणूक करीत नाहीत. सुमारे 70 टक्के गुंतवणूकदारांचे "इक्विटी'मध्ये 20 टक्क्यांपेक्षा कमी "अॅसेट अलोकेशन' असते आणि "रिअल इस्टेट', सोने, "पीएफ' व "पीपीएफ'मध्ये जास्त "अलोकेशन' असते. सर्व गुंतवणूकदारांनी त्यांचे "अॅसेट अलोकेशन' पुन्हा पहावे. सध्याची बाजारातील संधी साधण्यासाठी त्यांच्याकडील रोख रकमेचा वापर करावा. 

दीर्घकालीन फायद्यासाठी "इक्विटी'मध्ये गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. म्युच्युल फंड सही है, हे घोषवाक्य आताच्या परिस्थितीत अतिशय चपखल ठरते. "एसआयपी'च्या माध्यमातून "म्युच्युअल फंड' हा "इक्विटी' गुंतवणुकीचा अतिशय चांगला मार्ग आहे. मात्र, "अॅसेट अलोकेशन' आणि योग्य माहिती घेऊनच हा निर्णय घ्या. 

रिषभ पारख हे चार्टर्ड अकाउंटंट असून मनी प्लँट कन्सल्टन्सीचे संस्थापक व चीफ गार्डनर आहेत. फायनान्शिअल स्पिरिच्युअॅलिटी हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com