esakal | 'हेल्थ इन्शुरन्स' हवाच!
sakal

बोलून बातमी शोधा

health insurance

हेल्थ पॉलिसीचा प्रिमियम हा प्राप्तिकर कायद्यातील कलम 80 डी तरतुदीनुसार सवलतीस पात्र असतो. तसेच वयवर्ष 65 पूर्ण होण्याच्या आधी तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता.

'हेल्थ इन्शुरन्स' हवाच!

sakal_logo
By
ऋषभ पारख

सध्या कोरोना विषाणू आणि त्याच्याशी निगडित 'मेडिकल इमर्जन्सी'मुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक इमर्जन्सीने आपण सर्वच आयुष्यातील आव्हानात्मक काळाला सामोरे जात आहोत. या काळात 'मेडिकल इमर्जन्सी' निर्माण झाल्यास चांगली आरोग्य विमा पॉलिसी असणे अतिशय महत्वाचे आहे. परंतु, चांगला 'हेल्थ इन्शुरन्स प्लॅन' घेणे हे वाटते तेवढे सोपे नाही. कारण यात खूप किंतु आणि परंतु आहेत. 
याचमुळे 'हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी' घेण्याआधी विचार करावयाचे काही महत्वाचे मुद्दे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कितीचे 'इन्शुरन्स कव्हर' हवे आहे ?
'कव्हर' निश्चित करताना दोन निकष अतिशय महत्वाचे आहेत. सर्वप्रथम तुमच्या कुटुंबातील किती सदस्यांना कव्हर हवे आणि इतर निकष म्हणजे, तुम्ही राहात असलेले शहर, तुमची जीवनशैली आणि कोणत्या वर्गातील हॉस्पिटल हवे. हॉस्पिटलनुसार उपचाराचा खर्च बदलत जातो, याची तुम्हाला माहिती हवी. जेवढे मोठे आणि चांगले हॉस्पिटल तेवढा उपचाराचा खर्च अधिक असतो. त्यामुळे तुमच्या कुटुंबाला योग्य इन्शुरन्स कव्हर घेताना वरील निकषांच्या आधार घ्या. 

व्यक्तिगत कव्हर अथवा फॅमिली फ्लोटर प्लॅन? 
तुम्हाला कोणता प्लॅन खरेदी करावयाचा आहे याचा निर्णय घ्यावा लागेल. व्यक्तिगत 'हेल्थ कव्हर प्लॅन' आणि कुटुंबाला कव्हर करणारा 'फॅमिली फ्लोटर प्लॅन' असे दोन प्रकारचे प्लॅन असतात. कुटुंबाला कव्हर मिळत असल्याने हा प्लॅन अधिक किमतीचा वाटतो. मात्र, कुटुंबातील प्रतिव्यक्ती हिशेब केल्यास हा प्लॅन व्यक्तिगत प्लॅनपेक्षा कमी किमतीचा ठरतो. ही ठरवून घेतलेली जोखीम आहे. कारण, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एकाच वर्षात हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येत नाही. यामुळे फ्लोटर बहुतांश प्रकरणात योग्य ठरू शकतो. 

हॉस्पिटलच्या रूमची भाडेमर्यादा
हॉस्पिटलच्या रूमच्या भाडेमर्यादेचा नियम 'हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी'मध्ये असतो. याचाच अर्थ तुम्हाला एका मर्यादेपर्यंत वैद्यकीय खर्चाचा दावा करता येतो. हॉस्पिटलमध्ये तुम्ही जादा भाड्याची रूम घेतल्यास त्याचा अधिकचा खर्च तुम्हाला करावा लागतो. समजा तुमच्या पॉलिसीमध्ये रूमची भाडेमर्यादा 5 हजार रुपये असेल आणि तुम्ही 8 हजार रुपये भाडे असलेली रूम निवडल्यास तुम्हाला वरील 3 हजार रुपये स्वतः भरावे लागतील. 

सध्या असलेल्या आजाराचा प्रतीक्षा कालावधी 
पॉलिसी घेताना तुम्हाला सध्या असलेला आजार माहिती असतो. असा आजार 'मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी'मध्ये काही काळाच्या प्रतीक्षेनंतर समाविष्ट होतो आणि त्याचे नियम कंपनीपरत्वे वेगळे आहेत. 

दावे नाकारणे
आधी असलेल्या आजाराची माहिती दिली नाही म्हणून दावे नाकारले जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामुळे एखाद्या व्यक्तीला आधीच मधुमेह अथवा रक्तदाब असल्यास आणि त्याने तो पॉलिसी घेताना उघड न केल्यास दावा नाकारला जातो. 

प्रिमियम  वयानुसार वाढत जातो 
'लाईफ इन्शुरन्स'मध्ये प्रिमियम हा  पूर्ण कालावधी साठी  निश्चित असतो. त्यात बदल होत नाही. उलट हेल्थ इन्शुरन्स प्रिमियम तुमच्या वयाच्या दर पाच वर्षांनी वाढत जातो. 

हेल्थ पॉलिसीचा प्रिमियम हा प्राप्तिकर कायद्यातील कलम 80 डी तरतुदीनुसार सवलतीस  पात्र असतो. तसेच वयवर्ष 65 पूर्ण होण्याच्या आधी तुम्ही
हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता.

स्थिती ः 
व्यक्तिगत आणि 60 वर्षांखालील पालक 
व्यक्तिगत आणि कुटंबातील 60 वर्षांखालील सदस्य परंतु 60 वर्षांवरील पालक 
व्यक्तिगत, कुटुंब आणि पालक हे 60 वर्षांवरील 
भरलेला प्रिमियम 
स्वतः, कुटुंब, मुले ः पालक 
25,000 ः 25,000 
25,000 ः 50,000 
50,000 ः 50,000 
80 डी अंतर्गत वजावट 
50,000 
75,000 
1,00,000 
 

तुमच्या सध्याच्या पॉलिसीमध्ये कोरोनाचा समावेश आहे का? 

होय, जर सध्या तुमच्याकडे 'हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी' असेल तर त्यात कोरोनावर उपचाराचा  समावेश असेल. यासाठी तुम्हाला पॉलिसीच्या अटी आणि शर्ती तपासाव्या लागतील. मात्र, रोगाचा संसर्ग झाल्यानंतर पॉलिसी घेणाऱ्या व्यक्तीला उपचारासाठी कव्हर मिळणार नाही. हीच बाब प्रत्येक रोगासाठी लागू ठरते.

एखादी पॉलिसी घायची म्हंटलं की आपल्याला अनेक बारीक-सारीक गोष्टी तपासून घ्यायला हव्यात. अशात अनेक वेबसाईट्स या खोट्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या असतात. यासाठी तुम्हाला काय काळजी घायला हवी ? पॉलिसी घेताना कोणत्या गोष्टी तपासायला हव्यात ही माहिती तपासण्यासाठी अत्यंत विश्वासार्ह वेबसाईटला भेट द्या

या विश्वासार्ह मराठी वेबसाईटला भेट देण्यासाठी इथं क्लिक करा

loading image