दुर्घटना से देर भली!

रितेश मुथियान, श्रीनिवास जाखोटिया
सोमवार, 21 मे 2018

‘दुर्घटना से देर भली!’ हा फलक हायवेवर आपण अनेकदा वाचतो. तोच संदेश शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठीसुद्धा लागू पडतो. मागील चार महिन्यांमधील बाजारातील चढ-उतार लक्षात घेतल्यास हे नक्की पटेल. सध्याचा काळ हा खूप कठीण परीक्षेचा काळ आहे. प्रति बॅरल ८० डॉलरच्या आसपास आलेले कच्चे तेल, डॉलरच्या तुलनेत घसरलेला रुपया, जागतिक अस्थिरता यामुळे शेअर बाजार अस्थिर आहे. विशेषतः छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या शेअर भावात मोठी घट झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना एक प्रश्न नक्की सतावत असेल आणि तो म्हणजे आता पुढे काय करावे?

तेव्हा गुंतवणूकदारांनो, नेहमी नवे शेअर खरेदी करूनच पैसे कमावता येतात, असे नाही. तुम्ही काही काळापूर्वी विकलेले शेअर जर आता आपण विकलेल्या भावापासून कमीत कमी १५ ते २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त खाली आले असतील, तर अशा विकलेल्या शेअरची यादी बनवावी. या कंपन्यांच्या आर्थिक बाबी स्थिर असतील, तर अशा कंपन्यांच्या शेअरमध्ये पुन्हा गुंतवणूक करणे देखील फायद्याचे ठरू शकते. आपले जुने शेअर पुन्हा आपल्या खात्यात येतील आणि वरचा फरक हा आपला फायदा ठरू शकेल. फक्त हे करताना संबंधित कंपनीत नजीकच्या काळात झालेले बदल व आर्थिक ताळेबंदावर नजर टाकावी. सरसकट शेअर विकले असतील आणि आता ते खूप खाली आले आहेत म्हणून अजिबात खरेदी करू नयेत. 

जानेवारी महिन्यात बाजारात रोज नवे उच्चांक स्थापले जात असताना अनेकांना असे वाटत होते, की आता आपली संधी गेली. पण यासंदर्भात आम्ही नेहमी सांगत आलो आहोत, त्याप्रमाणे बाजार कायम संधी देत असतो, फक्त त्या संधीचा फायदा घेणे महत्त्वाचे असते. तेजीची संधी हुकली तरी चालेल; परंतु चुकीच्या शेअरमध्ये फसून मुद्दल कमी न झालेली बरी! थोडक्‍यात, ‘दुर्घटना से देर भली’ म्हणतात त्याप्रमाणे!

Web Title: rithesh muthiyan srinivas jakhotia article