Coronavirus : कोविड-19 पासून संरक्षण देणारी आरोग्य पॉलिसी निवडताना

रोशन थापा, बिझनेस हेड, सकाळ मनी 
Monday, 8 June 2020

पॉलिसी घेताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात आणि ज्यांच्याकडे अगोदरच आरोग्य विमा पॉलिसी आहे,त्यांना कोविड19 आजाराच्या समावेशाबद्दल अनेक शंका असल्याने विश्वासार्ह सल्ल्यासाठी "सकाळ बीमा' आहे. 

कोविड-19 च्या वाढत्या  प्रसाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विमा घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मात्र पॉलिसी घेताना कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात आणि ज्यांच्याकडे अगोदरच आरोग्य विमा पॉलिसी आहे, त्यांना कोविड19 आजाराच्या समावेशाबद्दल अनेक शंका असल्याने विश्वासार्ह सल्ल्यासाठी "सकाळ बीमा' आहे आपल्यासोबत आहे.  नव्या-जुन्या अशा सर्व पॉलिसीधारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून "सकाळ बीमा' हा प्रयत्न करत आहे :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विम्याची गरज का?
दीर्घकालीन लॉकडाउनचा पर्याय व्यावहारिकदृष्ट्या योग्य नसल्याने दैनंदिन उपजीविकेसाठी आपल्या सर्वांनाच घराबहेर घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र, संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोनावर अजून कोणत्याही प्रकारची लस किंवा औषध विकसित झालेले नाही. परिणामी कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्क, हातांची स्वछता, सुरक्षित अंतर राखणे हेच यावरील प्रमुख उपाय आहेत. मात्र, एकंदरीत कोरोनाचे स्वरूप पाहता संसर्गाचे प्रमाण वाढत आहे अशावेळी संपूर्ण कुटुंबाच्या संरक्षणासाठी आरोग्य विमा असणे महत्त्वाचे झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विद्यमान पॉलिसीमध्ये कोविड19 आजाराचा समावेश आहे का?
कोविड 19 हा श्वसनाशी संबंधित आजार असल्याने आणि विमा नियामक संस्था "आयआरडीए'ने सर्व आरोग्य विमा पॉलिसींमध्ये कोविड 19 चा समावेश करण्याच्या सूचना विमा कंपन्यांना दिल्या असल्याने विद्यमान आरोग्य विमा पॉलिसींमध्ये कोविड 19 पासून देखील संरक्षण मिळते. नव्याने पॉलिसी घेऊ इच्छिणारे पॉलिसी घेताना कोरोनाबाधित असू नये ही महत्त्वाची अट आहे.

कोविड 19 संरक्षणाअंतर्गत कोणत्या बाबींचा समावेश आहे?
आरोग्य विमा घेणाऱ्या पॉलिसीधारकाला कोविड 19 संबंधित सर्व उपचारांवर संरक्षण मिळणार आहे. जसे की, रुग्णालयातील उपचार, प्रि-हॉस्पिटॅलायझेशन- पोस्ट हॉस्पिटॅलायझेशन, अँब्युलन्स चार्जेस.

हेही वाचा : नव्याने सुरुवात करण्याची हीच संधी

कोविडची टेस्टिंग /चाचणी करण्यासाठी येणार खर्च देखील यात समाविष्ट आहे का?
नाही. चाचणीचा समावेश डायग्नॉस्टिक / निदान खर्चाअंतर्गत होत असल्याने त्या खर्चावर संरक्षण मिळत नाही. परंतु, जर रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह येऊन त्याला रुग्णालयात दाखल केले तर, प्री हॉस्पिटॅलायझेशनअंतर्गत या रकमेवर देखील संरक्षण मिळते. त्याशिवाय, ज्या आरोग्य विमा पॉलिसींमध्ये ओपीडी (बाह्यरुग्ण विभाग) खर्च समाविष्ट आहे अशा पॉलिसीअंतर्गत देखील डायग्नॉस्टिक खर्च मिळू शकतो.

'एसआयपी', गुंतवणुकीचा सोपा पण समृद्ध मार्ग

पॉलिसीमध्ये क्वारंटाईन कालावधी संरक्षित /कव्हर केला जातो का?
होय. अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार कोविड केंद्रात / कोविड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये क्वारंटाईन कालावधी कव्हर केला जातो. मात्र, होम क्वारंटाईन किंवा कोविड केंद्रांव्यतिरिक्त इतर ठिकाणी केलेल्या क्वारंटाईनला संरक्षण मिळत नाही. शिवाय कॅशलेस सुविधा आहे 

इतर लेख व बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोविड 19 उपचारासाठी अंदाजे किंमत खर्च येऊ शकतो?
उपचारासाठी साधारण 15 दिवसांचा कालावधी गृहीत धरून महानगरे म्हणजेच टियर-1 शहरांमधील खासगी रुग्णालयात 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येऊ शकतो. तर, टियर-3 शहरे म्हणजे ग्रामीण आणि निम्न शहरी भागात हा खर्च दोन लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तथापि, मधुमेह, बीपी, ह्रदयाशी संबंधित इतर आजार असणाऱ्यांसाठी या खर्चात वाढ होऊन तो 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत देखील येऊ शकतो.

कोविड 19 ला संरक्षण देऊ शकणाऱ्या स्वतंत्र विमा पॉलिसी आहेत का ?
होय. अनेक कंपन्यांनी कोविड 19 संबंधित स्वतंत्र  आरोग्य विमा पॉलिसी बाजारात आणल्या आहेत. याविषयीची अधिक माहिती  जाणून घेण्यासाठी आमच्या 'पॉईंट ऑफ सेल्स पर्सन'ला संपर्क करण्यासाठी  73508 - 73508 या क्रमांकावर  मिस्ड काॅल द्या.

योग्य विमा पॉलिसी निवडताना घ्यावयाची काळजी:
* आयपीडी (इन पेशंट डिपार्टमेंट) खर्चाबरोबरच डायग्नॉस्टिक खर्चाचा समावेश व्हावा यासाठी ओपीडी (बाह्य रुग्ण विभाग) खर्चाचा समावेश.
* कव्हरेज अमाऊंट : शहर आणि रुग्णाच्या आजारानुसार 2 लाख ते 20 लाख रुपये.
* को -पेमेंट / रूम रेंट : को -पेमेंटचा पर्याय असलेली पॉलिसी निवडू नये. रूम रेंट / खोली भाड्यासाठी मर्यादा नाहीत याची खबरदारी घ्यावी.
*कंझ्यूमेबल खर्चाचा समावेश असणारी पॉलिसी निवडावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: roshan thapa article choosing a health policy that protects against covid-19