नव्याने सुरुवात करण्याची हीच संधी

नव्याने सुरुवात करण्याची हीच संधी

कोरोनामुळे शेअर बाजारासाठी गेल्या काही महिन्यात मोठी उलथापालथ झाली. तात्पुरते कोरोनाच्या घटनेकडे दुर्लक्ष करून शेअर बाजाराच्या घडामोडींकडे बघितले असता हा कालावधी खूपच रोमांचक होता हे जाणवेल. 20 जानेवारी रोजी सेन्सेक्स 42 हजार 273 या सर्वोच्च पातळीवर होता. मात्र महिन्याभरातच शेअर बाजारात मोठे करेक्शन येऊन सेन्सेक्स 40 टक्क्यांनी कोसळला. मात्र तो तितेच थांबला नाही. तो तिथून पुन्हा  25 टक्क्यांनी वधारला.

शेअर बाजारात रोलर कोस्टर राइड!
शेअर बाजारात झालेल्या चढ-उतारांमध्ये अनेकांनी पैसे कमावले. मात्र, बहुतांश  किरकोळ गुंतवणूकदारांना थेट इक्विटी किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती गमवावी लागली. अशावेळी प्रश्न पडतो तो म्हणजे पुढे काय?
 गुंतवणूकदारांचा यापुढे गुंतवणुकीबाबत दृष्टिकोन कसा असला पाहिजे यावर "सकाळ मनी'ने अभ्यास करून योजना तयार केली आहे.

गुंतवणुकीचे रक्षण करण्यासाठी काय करावे? 
बाजाराची सद्यस्थिती लक्षात घेता गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओमध्ये योग्य बदल केल्यास येणाऱ्या "रिकव्हरी'च्या काळात त्याचा नक्कीच फायदा होईल.

"अॅसेट अॅलोकेशन'चे पुनरावलोकन 
इक्विटी बाजारामध्ये झपाट्याने झालेल्या घसरणीमुळे "पोर्टफोलिओ'च्या एकूण मालमत्ता मूल्यांकनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता देखील बदलली आहे. अशावेळी "पोर्टफोलिओ'च्या मालमत्तेचे नव्याने संतुलन करण्याची वेळ आली आहे. जेणेकरून गुंतवणूक उद्दिष्ट आणि जोखीम पातळी लक्षात येईल.

उदा. जर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी आणि सोन्याचे प्रमाण 50:50 असेल तर ते आता 40:60 असे झाले असेल. परंतु यामुळे तुमचा पोर्टफोलिओ तुमची जोखीम घेण्याची क्षमता प्रतिबिंबित करत नाही. त्यामुळे तुम्ही नव्याने काही गुंतवणूक इक्विटीमध्ये करून पुन्हा हे प्रमाण 50:50 केले पाहिजे.

"इक्विटी'त गुंतवणूक कशी कराल?
"इक्विटी मार्केट'मधील अस्थिरता आता प्रत्येकाच्या लक्षात आली आहेच.  "इक्विटी'त गुंतवणूक करताना तात्पुरत्या फायद्याचा दृष्टिकोन उपयोगी येणार नसून स्थिर दृष्टिकोनच असणे गरजेचा आहे. स्थिर दृष्टिकोनामुळे कदाचित दोन-तीन दिवसांमध्ये येणारी तेजी किंवा नफा मिळणार नाही, मात्र दीर्घमुदतीत सरासरी पातळीवर ही कसर सहज भरून निघेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महत्त्वाचे: जर तुम्हाला एकाच "अॅसेट क्लास'मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे पुरेशी "लिक्विडीटी' आहे याची खात्री करा.

अल्फा जनरेट करण्याची क्षमता असणारे फंड निवडा
सकारात्मक परताव्याच्या आशेने बऱ्याचदा अनेक गुंतवणूकदार जोखीम असणाऱ्या गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक करतात आणि ती धरून ठेवतात. मात्र फंडाची कामगिरी चांगली नसताना देखील गुंतवणूक अडकून ठेवणे म्हणजे आपल्या पैशांनी आपल्यासाठी जेवढे कष्ट केले पाहिजेत तेवढे ते करत नाहीत,हे लक्षात घेतले पाहिजे. यामुळे सध्याच्या अस्थिरतेकडे सकारात्मकतेने पाहून नव्याने सुरुवात करण्याची हीच योग्य संधी आहे

महत्त्वाचे : गुंतवणूक करताना एखादा फंड खूपच चांगली कामगिरी करत आहे म्हणून कुठलीही माहिती न घेता आंधळेपणाने त्यात गुंतवणूक करणे टाळा. कोणताही परतावा शाश्वत स्वरूपाचा नसतो. गुंतवणूक करताना नेहमी फंडाचे सखोल विश्लेषण करणे गरजेचे आहे. फंडाच्या कामगिरीत सातत्य, अल्फा सुसंगतता, बीटा, स्टॅंडर्ड डेव्हिएशन, शार्प रेशो, पोर्टफोलिओ अॅलोकेशन आणि फंडामागील टीम या सर्व गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे.

"पोर्टफोलिओ' नीटनेटका असावा
अनेक गुंतवणूकदार शेअर खरेदी केल्याप्रमाणे म्युच्युअल फंड खरेदी करतात. परिणामी "पोर्टफोलिओ'मध्ये योजनांचा ढीग जमा होतो. काही म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक बाजारातील शेअरमध्ये केलेली असते. त्यामुळे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये खूप योजना असतील तर तुमची जवळपास सर्वच गुंतवणूक  शेअरमध्ये केलेली असल्याने तुम्हाला ज्यासाठी आपण गुंतवणूक करतो तो "अल्फा फॅक्टर' हाती येणार नाही. त्यामुळे गुंतवणूकीतील अस्ताव्यस्तपणा टाळून नीटनेटकी करावी. म्हणजे गुंतवणूक योग्य प्रकारे ट्रॅक करून पोर्टफोलिओचे संतुलन राखण्यास मदत होईल.

फ्रँकलिन टेंपल्टनने काही योजना बंद केल्याने गुंतवणूकदार घाबरले होते. 
पण, गुंतवणूकदारांनी पुढील मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे आहे.

• घाबरून जाऊ नका; योजना तयार करा

• घाईघाईने कोणताही निर्णय घेण्याऐवजी व्यवस्थित योजना आखणे केंव्हाही चांगले. 

• क्रेडिट जोखीम कमी करून सुरक्षित फंडांमध्ये गुंतवणूकीचा विचार केला पाहिजे. 

• संतुलित, अधिक सुरक्षित पोर्टफोलिओ शोधले पाहिजेत ज्यामध्ये जास्त परताव्याची अपेक्षा करून कमी रेटिंगच्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक केलेली नसेल. कॉर्पोरेट बाँड्स, बँकिंग आणि पीएसयू बाँड फंड सारख्या काही योजना सुरक्षित मानल्या जातात.

सकाळ मनी आऊटलूक 
कोरोना प्रादुर्भावामुळे जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने त्याचा शेअर बाजारावर परिणाम होऊन म्युच्युअल फंडांमधील परताव्याला मोठा फटका बसला आहे. परंतु इतिहास बघितल्यास लक्षात येईल, की अशा परिस्थितीनंतर शेअर बाजार आणि फंड परताव्यांनी मोठी उसळी घेतली आहे. हे लक्षात ठेवून, गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक सुरूच ठेवून स्थिर दृष्टीकोन बाळगावा. तुम्हाला देखील तुमच्या पोर्टफोलिओचे संतुलन करण्यासाठी किंवा पुनर्रचना करण्यासाठी कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास निःसंकोचपणे "सकाळ मनी'च्या रिलेशनशिप मॅनेजरशी त्वरित संपर्क साधा आणि विनामूल्य डिजिटल वेल्थ कॅम्पसाठी नोंदणी करून पूर्ण निःपक्षपातीपणे पोर्टफोलिओची आरोग्य तपासणी करून घ्या. 


अधिक माहितीसाठी सकाळ मनीच्या सोशल मीडियावर - फेसबुक आणि लिंक्डइनवर जाऊन पेज लाईक करा  आणि गुंतवणुकीसंदर्भात "अपडेट' रहा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com