esakal | 'एसआयपी', गुंतवणुकीचा सोपा पण समृद्ध मार्ग
sakal

बोलून बातमी शोधा

SIP

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्याचा एसआयपी हा एक उत्तम मार्ग आहे. दीर्घकालासाठी एसआयपीच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक भविष्यात तुम्हाला मोठी रक्कम उभी करून देऊ शकते. विशेषत: तरुण वयातच जर एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू केली तर दहा, वीस किंवा पंचवीस वर्षांनी मोठी रक्कम उभी राहते. एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचे फायदे लक्षात घेऊया.

'एसआयपी', गुंतवणुकीचा सोपा पण समृद्ध मार्ग

sakal_logo
By
विजय तावडे

इक्विटी प्रकारात गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंडाचा पर्याय सर्वसामान्यांना उपलब्ध झालेला आहे. इक्विटीचा फारसा अभ्यास नसेल मात्र जोखीम घेऊन यात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. कारण म्युच्युअल फंड योजनेचे तज्ज्ञ फंड मॅनेजर बाजारातील स्थितीनुसार त्या फंडातील गुंतवणूकीचे व्यवस्थपान करत असतात. त्यातही म्युच्युअल फंडात दोन प्रकारे गुंतवणूक करता येते. एक म्हणजे एकरकमी गुंतवणूक करणे, जसे आपण बँकातील मुदतठेवी किंवा पोस्टातील योजनांबाबत करतो. दुसरा मार्ग म्हणजे दर महिन्याला नियमितपणे छोट्याश्या रकमेची गुंतवणूक करणे, यालाच सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा एसआयपी असे म्हणतात.

 म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना टाळा 'ह्या' चूका

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करण्याचा एसआयपी हा एक उत्तम मार्ग आहे. दीर्घकालासाठी एसआयपीच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक भविष्यात तुम्हाला मोठी रक्कम उभी करून देऊ शकते. विशेषत: तरुण वयातच जर एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू केली तर दहा, वीस किंवा पंचवीस वर्षांनी मोठी रक्कम उभी राहते. एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचे फायदे लक्षात घेऊया.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1) एसआयपीद्वारे गुंतवणूकीस सुरूवात केल्यास दरमहिन्याला विशिष्ट रक्कम नियमितपणे गुंतवायची सवय लागते. यातून एक प्रकारची आर्थिक शिस्त तयार होते.

2) एसआयपीद्वारे आपण अगदी 500 किंवा 1,000 रुपये प्रति महिन्याने गुंतवणूक करू शकतो. त्यामुळे फार छोट्या रकमेने गुंतवणुकीची सुरूवात करता येते.

3) इक्विटीसारख्या अधिक जोखीम असलेल्या परंतु अधिक परतावा देऊ शकणाऱ्या गुंतवणूक प्रकारात शिस्तबद्धपणे गुंतवणूक करण्याची संधी मिळते.

4) म्युच्युअल फंड योजनेचे फंड मॅनेजर आपल्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत असल्याने रोजच्या रोज शेअर बाजाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता नसते. सहा महिन्यांनी किंव वर्षभराने आपण आपल्या फंडाच्या कामगिरीचा आढावा घेऊ शकतो.

स्टेट बँकेला 3,580 कोटींचा नफा; व्याजापोटी बँकेला 22 हजार  954 कोटीचे उत्पन्न

5) चक्रवाढवृद्धी हा एसआयपीद्वारे गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा आहे. दीर्घकालावधीसाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास छोट्या गुंतवणुकीतून मोठी रक्कम उभी राहू शकते. एसआयपीद्वारे संपत्ती निर्मिती करण्यास मोठा हातभार लागतो.

6) रुपी कॉस्ट अॅव्हरेजिंगचा लाभ
एसआयपीद्वारे आपण दर महिन्यालाच गुंतवणूक करत असतो. शेअर बाजारात चढ आणि उतार हे होतच असतात. मात्र दीर्घकालासाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास चढ असतानाच्या शेअरच्या किंमती आणि बाजार घसरलेला असतानाच्या शेअरच्या किंमती यांच्या सरासरीचा लाभ गुंतवणूकदारास होऊन मोठी रक्कम उभी राहते. शेअर बाजारातील चढ-उतारांनी आपल्याला कोणत्याही ताणतणावाला सामोरे जावे लागत नाही.

7) दरवर्षी आपले उत्पन्न वाढल्यास एसआयपीद्वारे केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीच्या रकमेत वाढ करता येण्याची सुविधा असते. याचा लाभ घेत दरवर्षी  आपण गुंतवित असलेल्या रकमेत किमान दहा टक्के तरी वाढ करावी. म्हणजे अधिक रक्कम गुंतवली जाऊन दीर्घकालात त्यातून भरभक्कम रक्कम उभी राहते.