रुपया अखेर सावरला

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 मे 2018

मुंबई, - रिझर्व्ह बॅंकेच्या हस्तक्षेपामुळे चलन बाजारातील रुपयाच्या पडझडीला बुधवारी ‘ब्रेक’ बसला. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावातील घसरण आणि रिझर्व्ह बॅंकेच्या उपाययोजनांमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य २७ पैशांनी वधारले. दिवसअखेर तो ६७.८० वर बंद झाला.  सकाळी बाजार उघडताच रुपयाने ६८.१४ ची पातळी गाठली होती.

शेअर बाजारातील नकारात्मकतेचा फटका चलनाला बसला. गेल्या १६ महिन्यांतील नीचांकी स्तर गाठल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने चलन बाजारात हस्तक्षेप केल्याची शक्‍यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने चलन बाजारात मोठ्या प्रमाणात डॉलरची विक्री केली. यामुळे रुपयाचे मूल्य २७ पैशांनी वधारले. 

Web Title: Rupee rises 27 paise against dollar