सहाराला दणका: 19 जूनपर्यंत पैसे भरा अन्यथा तुरुंगात जा

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

सहारा समूहाची मालकी असलेल्या लोणावळ्यातील प्रतिष्ठित "अँबी व्हॅली' या सुमारे 34 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिला होता.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सहारा समुहाला 19 जूनपर्यंत पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो राय यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. याआधी सहारा समूहाची मालकी असलेल्या लोणावळ्यातील प्रतिष्ठित "अँबी व्हॅली' या सुमारे 34 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे

सहाराने 1500 कोटी आणि 500 कोटी रुपयांचे पुढील तारखेचे धनादेश दिले आहेत. त्यामुळे धनादेश दिलेल्या तारखेस न वटल्यास सुब्रतो राय यांना पुन्हा तुरुंगात पाठवले जाईल असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. याआधी 12 जानेवारी रोजी सहाराकडून पैसे उभे करण्यास नोटाबंदीमुळे अडचण येत असल्याचे कारण देण्यात आले होते. मात्र न्यायालयाने सहाराकडून देण्यात आलेले नोटाबंदीचे कारण फेटाळून लावले आहे. आता पुढील सुनावणी 19 जून रोजी होणार आहे.

नियोजित वेळेच्या आत हे पैसे जमा न केल्यास सहारा समुहाचे प्रमुख सुब्रतो राय यांची रवानगी तुरूंगात होण्याची शक्यता आहे. याआधी न्यायालयाने सहारा समुहाला 600 कोटी रूपये जमा करण्याचे आदेश दिले होते. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सुब्रतो राय यांना .4 मे 2014 रोजी अटक करण्यात आली होती.

सहारा समूहाची मालकी असलेल्या लोणावळ्यातील प्रतिष्ठित "अँबी व्हॅली' या सुमारे 34 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात दिला होता.
(अर्थविषयक ताज्या घडोमोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा www.sakalmoney.com

Web Title: Sahara chief Subrata Roy warned by Supreme Court: Pay fee or go to Tihar Jail