esakal | Sansera Engineering 1280 कोटीचा IPO येतोय; कमवायला तयार रहा!
sakal

बोलून बातमी शोधा

Sansera Engineering 1280 कोटीचा IPO येतोय; कमवायला तयार रहा!

14 सप्टेंबरला ऑटोमोबाईल घटक (Components) बनवणारी कंपनी बंपर कमवण्याची संधी देणार आहे. कंपनीचा 1280 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) पुढच्या आठवड्यात मंगळवारी येणार आहे. 16 सप्टेंबरपर्यंत यासाठी गुंतवणूक करता येईल.

Sansera Engineering 1280 कोटीचा IPO येतोय; कमवायला तयार रहा!

sakal_logo
By
टीम इसकाळ

- शिल्पा गुजर

Sansera Engineering IPO: कंपनीचा 1280 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) पुढील आठवड्यात मंगळवारी येणार आहे. 14 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर या कालावधीत त्यासाठी गुंतवणूक करता येईल. संसेरा इंजिनिअरिंगने याचा प्राईस बँड 734-744 रुपये निश्चित केला आहे. कंपनीने यावर्षी जून 2021 मध्ये आयपीओसाठी बाजार नियामक सेबीकडे अर्ज केला होता, ज्याला ऑगस्टमध्ये मान्यता देण्यात आली होती.=

पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल

संसेरा इंजिनिअरिंगचा आयपीओ पुर्णतः ऑफर फॉर सेल असणार आहे. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून एकूण 1,72,44,328 इक्विटी शेअर्स विकले जातील. ओएफएसमधील 86,35,408 शेअर्स क्लायंट एबेने लिमिटेडद्वारे (Client Ebene Ltd) विकले जातील. सीव्हीसीआयजीपी II कर्मचारी ईबीईएनईद्वारे (CVCIGP II Employees EBENE) 48,36,723 शेअर्स तर 2058069 शेअर्स एस शेखर वासन यांच्याद्वारे, तर 571376 शेअर्स उन्नी राजगोपाल के यांच्या माध्यमातून, 571376 शेअर्स एफआर सिंघवी यांच्यामार्फत आणि डी देवराज यांच्याद्वारे 571376 शेअर्स विकले जातील.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज, आयआयएफएल सिक्युरिटीज आणि नोमुरा फायनान्शियल अॅडव्हायझरी अँड सिक्युरिटीज (इंडिया) Nomura Financial Advisory and Securities (India) या आयपीओसाठी मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करणार आहेत.

हेही वाचा: व्होडाफोन-आयडियाच्या शेअर्समध्ये 5 दिवसांत 40 टक्क्यांनी वाढ

किमान किती गुंतवणूक आवश्यक ?

संसेरा इंजिनिअरिंगने आपल्या आयपीओसाठी 20 शेअर्सचा एक लॉट निश्चित केला आहे. म्हणजे अप्पर प्राईस बँडनुसार किमान 14880 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. संसेरा इंजिनिअरिंग ऑटोमोटिव्ह आणि नॉन-ऑटोमोटिव्ह क्षेत्रांसाठी कांप्लेक्स आणि क्रिटिकल प्रेसिशन इंजीनियर्ड कंपोनेंट्स तयार करते. कंपनीचे देशभरात 15 उत्पादन प्रकल्प (Manufacturing Project) आहेत. कंपनीचा 65 टक्के महसूल देशांतर्गत व्यवसायातून येतो.

हेही वाचा: IRCTC Share: आयआरसीटीसीच्या शेअर्सची कमाल, गुंतवणुकदार मालामाल

कोणासाठी किती जागा राखीव ?

संसेरा इंजिनिअरिंगच्या आयपीओचा 50 टक्के भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (Qualified Institutional Buyers), 15 टक्के संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institututional Investors) आणि 35 टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) राखीव आहे. तर 9 कोटी शेअर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. कंपनीचे कर्मचारी प्रति शेअर 36 रुपये सवलतीच्या किंमतीत बोली लावू शकतात.

आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचा महसूल 1572.36 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2020 मधील महसूल 1828.24 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचा नफा 110 कोटी रुपयांच्या जवळपास होता.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

loading image
go to top