
Saudi Arabia Citizenship : सौदी अरेबियाने बदलले नागरिकत्वाचे नियम; लाखो भारतीय कामगारांना...
Saudi Arabia Changed Citizenship Rules : सौदी अरेबियाने नागरिकत्व नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. राजे सलमान बिन अब्दुल अझीझ यांनी शाही हुकूम जारी केला आहे आणि नागरिकत्वासाठी नवीन नियम तयार केले आहेत.
एखाद्या व्यक्तीला सौदी अरेबियाचे नागरिकत्व कधी मिळू शकते, या तरतुदी त्यांनी नमूद केल्या आहेत. हा बदल कोणाचे नागरिकत्व काढून घेण्यासाठी नसून ते देण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी सौदी अरेबियाच्या नागरिकत्व कायद्याच्या कलम 8 मध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे.
सौदीमध्ये नागरिकत्वाच्या नियमांमध्ये बदल :
सौदी अरेबियाच्या सरकारने देशातील नागरिकत्वाबाबत मोठा बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, परदेशी पुरुषांशी विवाह केलेल्या सौदी महिलांची मुले आता 18 वर्षांची झाल्यानंतर नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. शाही आदेशानंतर नागरिकत्व कायद्याच्या कलम 8 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
सौदीमध्ये नागरिकत्वासाठी काय आहे नवीन नियम ?
जर वडील सौदी अरेबियाचे नागरिक असतील तर मुलाला आपोआप नागरिकत्व मिळते. दुसरीकडे, जर आई सौदी अरेबियाची नागरिक असेल आणि वडील परदेशी असतील तर मुलांना 18 वर्षानंतर नागरिकत्व मिळू शकेल.
नागरिकत्व मिळवण्यासाठी काही अटी प्रभावी असतील. उदाहरणार्थ, मुलाचा जन्म फक्त आखाती देशांमध्येच झाला पाहिजे. यासोबतच त्याचे चारित्र्यही चांगले असावे.
त्या मुलांवर फौजदारी खटले प्रलंबित नसावेत आणि त्यांना अरबी भाषेचे ज्ञान असावे. जर त्यांनी या सर्व अटी पूर्ण केल्या तर 18 वर्षानंतर त्यांना नागरिकत्व मिळू शकते.
हेही वाचा: CBI Raid : 217 कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयचे 12 ठिकाणी छापे; 1.99 कोटी रुपये केले जप्त
भारतावर काय परिणाम होईल?
सौदी अरेबियात लाखो भारतीय राहतात. अनेक भारतीयांनी सौदी वंशाच्या महिलांशी विवाहही केला आहे. पूर्वी सौदी अरेबियाचे नागरिकत्व मिळणे खूप अवघड होते. कारण नागरिकत्वाचे अधिकार महिलांपेक्षा पुरुषांना जास्त दिले जात होते.
अशा स्थितीत सौदीतील नागरिकत्वाच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाचा लाखो भारतीयांना फटका बसणार आहे. अनेक भारतीय पूर्णपणे सौदीत स्थायिक झाले आहेत. तसेच अनेक लोक फक्त कामासाठी तिथे स्थायिक झाले आहेत.
सौदी अरेबियामध्ये मोठ्या संख्येने भारतीयांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. नागरिकत्वाच्या अस्पष्ट अटींमुळे पूर्वी त्यांच्या मुलांना त्याचे फायदे मिळू शकत नव्हते, पण आता त्यांनाही सहज नागरिकत्व मिळू शकणार आहे.