'जिओ'मध्ये होणार आणखी एक गुंतवणूक, सौदी अरेबियन कंपनीकडून होण्याची शक्यता

Mukesh-Ambani
Mukesh-Ambani

सौदी अरेबियाचा वेल्थ फंड, पब्लिक इन्व्हेस्टमेंट फंड (पीआयएफ) रिलायन्स जिओमध्ये १.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. पीआयएफ जिओ प्लॅटफॉर्म्सचा २.३३ टक्के हिस्सा विकत घेणार आहे, असे वृत्त गल्फ न्युजमध्ये देण्यात आले आहे. पीआयएफ आणि रिलायन्समध्ये यासंदर्भातील बोलणी सुरू असल्याची माहिती आहे. जिओचे २५ टक्के इक्विटी हिस्सा गुंतवणूकदारांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

मागील सात आठवड्यात रिलायन्स जिओमध्ये तब्बल १० गुंतवणूक झाल्या आहेत. सर्वात अलीकडची गुंतवणूक टीपीजी आणि एल कॅटरटॉनकडून करण्यात आली आहे. या दोन्ही कंपन्यांनी जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अनुक्रमे ४,५४६.८० कोटी रुपये आणि १,८९४.५० कोटी रुपयांची गुंतवणूक करत ०.९३ टक्के आणि ०.३९ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. या करारानंतर जिओ प्लॅटफॉर्म्सने विकलेला एकूण इक्विटी हिस्सा २२.३८ टक्के इतका झाला आहे. जिओमध्ये झालेली एकूण गुंतवणूक १.०४ लाख कोटी रुपयांवर पोचली आहे.

जिओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये फेसबुक, सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी, जनरल अटलांटिक, केकेआर आणि मुबादला या कंपन्यांचा समावेश आहे. जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये आतापर्यत सर्वाधिक मोठी गुंतवणूक फेसबुकने केली आहे. २२ एप्रिलला फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये ४३,५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक करत ९.९९ टक्के हिस्सा विकत घेतला होता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सिल्व्हर लेकने ५,६५६ कोटी रुपयांना १.१५ टक्के हिस्सा विकत घेतला होता. व्हिस्टा इक्विटीने ११,३६७ कोटी रुपयांची गुंतवणूक करत जिओमध्ये २.३२ टक्के हिस्सा विकत घेतला होता. जनरल अटलांटिकने ६,५९८ कोटी रुपयांना १.३४ टक्के हिस्सा तर केकेआरने ११,३६७ कोटी रुपये गुंतवत २.३२ टक्के हिस्सा विकत घेतला होता. मुबादलाने ९,०९३ कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे रिलायन्स जिओमध्ये १.८५ टक्के हिस्सा विकत घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com