घसरणीनंतर शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल; सेन्सेक्समध्ये ३५९ अंशांची वाढ

घसरणीनंतर शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल; सेन्सेक्समध्ये ३५९ अंशांची वाढ

कालच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल सुरू आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स या दोन्ही निर्देशांकात वाढ नोंदवण्यात आली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९९ अंशांची तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३५९ अंशांची वाढ सकाळच्या सत्रात दिसून आली. सेन्सेक्स ३३,५८७ अंशांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. तर निफ्टी ९,९०९ अंशांच्या पातळीच्या वर व्यवहार करतो आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींमुळे काल शेअर बाजारात घसरण झाली होती. आज मात्र निफ्टी बॅंकसह इतर निर्देशांकातसुद्धा सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली आहे. एचडीएफसी, एचडीएफसी बॅंक, हिंडाल्को यांच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाली आहे तर टाटा मोटर्स, अॅक्सिस बॅंक, इंडसइंड बॅंक, गेल या कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली आहे.

* सेन्सेक्स ३३,५८७ अंशांच्या पातळीवर
* निफ्टी ९,९०९ अंशांच्या पातळीवर 
* निफ्टीमध्ये ९९ अंशांची वाढ
* सेन्सेक्समध्ये ३५९ अंशांची वाढ

कच्च्या तेलाच्या किंमतींमध्येही तेजी नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतसुद्धा वाढ झाली आहे. एमसीएक्सवर कच्चे तेल २८७५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करते आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तर डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात मात्र घसरण सुरूच आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया ०.१९ रुपयांनी घसरला आहे. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया ७६.२१ रुपये प्रति डॉलरवर व्यवहार करतो आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com