Video : 'एसबीआय'चे अध्यक्ष म्हणतात, 'येस बँकेला अपयशी होऊ देणार नाही!'

वृत्तसंस्था
Thursday, 23 January 2020

प्रचंड मोठ्या स्वरूपात आर्थिक उलाढाल असलेल्या बँकेला भांडवल उभारणीच्या कारणास्तव अपयशी होऊ देणे भारताच्या अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही.

नवी दिल्ली : स्थिर भांडवल उभारणी करताना येस बँकेला अडचणी येत आहेत, मात्र लवकरच त्यांना नवीन आणि चांगला पर्याय मिळेल, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तब्बल 40 बिलियन डॉलर्सचे बॅलन्स शीट असलेली येस बँक ही देशातील एक प्रमुख बँक आहे. त्यामुळे या बँकेला अपयशी होऊ दिले जाणार नाही असे रजनीश कुमार यांनी ब्लूमबर्ग टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. ते दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.

- फिक्स्ड डिपॉझीट हा सर्वांत उत्तम गुंतवणूक पर्याय का मानला जातो?

प्रचंड मोठ्या स्वरूपात आर्थिक उलाढाल असलेल्या बँकेला भांडवल उभारणीच्या कारणास्तव अपयशी होऊ देणे भारताच्या अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही. त्यामुळे येस बँक नक्कीच उभारी घेईल, असे मत रजनीश कुमार यांनी व्यक्त केले.

- देशातील अवघ्या ६३ उद्योगपतींकडे अर्थसंकल्पापेक्षा अधिक पैसे!

एसबीआय ही भारत सरकारची मालकी असलेली बँक आहे. त्यामुळे एसबीआयच्या माध्यमातून सरकार येस बँकेला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी मदत करेल, असा अंदाज रजनीश कुमार यांच्या वक्तव्यानंतर व्यक्त केला जात आहे. याअगोदर देखील हा विषय चर्चेत आला होता.

- उबर इट्सची झोमॅटोकडून तब्बल एवढ्या डॉलरला खरेदी

दरम्यान या वृत्तानंतर येस बँकेचा शेअर 7 टक्क्यांनी वधारून 41 रुपयांवर व्यवहार करत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI chairman Rajnish Kumar said that Yes Bank will not be allowed to fail