स्टेट बँक 20 हजार कोटींचा निधी उभारणार

वृत्तसंस्था
शनिवार, 8 डिसेंबर 2018

नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक 20 हजार कोटींचा निधी उभारणार आहे. यासाठी नुकतीच शेअरधारकांकडून मंजुरी मिळाली आहे. बँकेने मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निधी उभारण्याच्या माध्यमाचा निर्णय घेतला जाणार आहे.

फॉलो अप ऑफर किंवा प्रायव्हेट प्लेसमेंटच्या माध्यमातून किंवा क्वालिफाइड इन्स्टिट्यूशन्स प्लेसमेंट (ओआयपी), ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट (जीडीआर), अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट (एडीआर) किंवा अन्य माध्यमातून निधी उभारण्याच्या बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. 

काल (शुक्रवार) मुंबई शेअर बाजारात स्टेट बँकेचा शेअर 275.40 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे 2 लाख 45 हजार 783.14 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या बँकेच्या शेअरने वर्षभरात 232 रुपयांची नीचांकी तर 334.80 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI Gets Shareholders' Approval To Raise Up To Rs. 20,000 Cr