SBI स्वस्त व्याजात देत आहे टू-व्हीलर लोन, घरबसल्या करा अर्ज! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

SBI Exam

देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांना प्री-अप्रूव्ड लोन देत आहे.

SBI स्वस्त व्याजात देत आहे टू-व्हीलर लोन, घरबसल्या करा अर्ज!

दिवाळीनंतरही सणासुदीच्या ऑफर्स सुरूच असतात. अशा परिस्थितीत, जर तुमची टू-व्हीलर खरेदी करण्याचे प्लॅन करत असाल, तर देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांना प्री-अप्रूव्ड लोन देत आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे या कर्जासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही. त्यापेक्षा तुम्ही घरी बसल्या बसल्या अर्ज करु शकता. चला तर मग त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

हेही वाचा: SBI च्या 'या' ग्राहकांना लाखोंचा फायदा... जाणून घ्या!

SBI Bank

SBI Bank

SBIचा इझी राइड लोन

SBI ने त्यांच्या YONO अॅपद्वारे हे प्री-अप्रूव्ड लोन SBI Easy Ride सादर केले आहे. यामध्ये टू-व्हीलर खरेदी करण्यासाठी किमान 20 हजार रुपयांपासून ते ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेता येते.

SBIच्या कर्जावरील व्याज एवढेच असेल

SBI इझी राइड कर्जासाठी बँक फक्त 10.5 टक्के वार्षिक व्याज आकारत आहे. हे कर्ज जास्तीत जास्त 4 वर्षांच्या कालावधीसाठी घेतले जाऊ शकते. ही कर्जाची रक्कम ग्राहकाच्या खात्यात येणार नसली तरी पास झाल्यानंतर ती थेट टू-व्हीलर विक्रेत्याच्या खात्यात जाईल.

हेही वाचा: परदेशात शिक्षण घेणं झालं सोप्प; SBI देतंय कमी दरात कर्ज

loan

loan

टू-व्हीलरची ऑन-रोड किमतीवर कर्ज

SBI इझी राइड कर्ज कोणत्याही टू-व्हीलरच्या ऑन-रोड किमतीवर उपलब्ध आहे, एक्स-शोरूम किमतीवर उपलब्ध नाही. कोणत्याही वाहनाची ऑन-रोड किंमत त्याच्या एक्स-शोरूम किमतीपेक्षा जास्त असते कारण त्यात रोड टॅक्स, इन्शुरन्ससह नोंदणी शुल्क समाविष्ट असते. SBI Easy Ride मध्ये ग्राहकाला ऑन-रोड किमतीच्या 85 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल.

SBI इझी राइडची EMI

बँकेचे म्हणणे आहे की SBI Easy Ride मध्ये ग्राहक 2,560 रुपये प्रति लाख EMI वर कर्ज घेऊ शकतात. SBI म्हणते की YONO अॅपवर ही त्यांची नवीनतम लोन स्कीम आहे.

हेही वाचा: SBI कडून मोठी ऑफर; गृहकर्ज घेणाऱ्यांना होणार बंपर फायदा

SBI

SBI

YONO वर कसा करावा अर्ज

SBI Easy Ride लोनसाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये SBI YONO अॅप असणे आवश्यक आहे. या अॅपवर लॉग इन केल्यानंतर, तुम्ही कर्ज विभागात जाऊन टू-व्हीलर लोन किंवा एसबीआय इझी राइड तपासू शकता. या विभागात तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, पगार/उत्पन्न तपशीलासारखी काही माहिती द्यावी लागेल. अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या या कर्जासाठी अर्ज करू शकता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SBI
loading image
go to top