एसबीआयला ७,७१८ कोटींचा तोटा

एसबीआयला ७,७१८ कोटींचा तोटा

नवी दिल्ली - देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (एसबीआय) मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत ७ हजार ७१८ कोटी रुपयांचा तोटा झाला. बॅंकेचे थकीत कर्जांचे प्रमाण वाढल्याने हा तोटा झाला आहे. 

आर्थिक वर्ष २०१६-१७ च्या चौथ्या तिमाहीत बॅंकेला २ हजार ८१४ कोटी रुपयांचा नफा झाला होता. मागील आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीपासून बॅंकेचा तोटा वाढू लागला आहे. तिसऱ्या तिमाहीत बॅंकेला २ हजार ४१६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. चौथ्या तिमाहीत बॅंकेचे एकूण उत्पन्न ६८ हजार ४३६ कोटी रुपये आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत एकूण उत्पन्न ५७ हजार ७२० कोटी रुपये आहे.

चौथ्या तिमाहीत बॅंकेचे एकूण कर्जातील थकीत कर्जांचे प्रमाण १०.९१ टक्‍क्‍यांवर पोचले आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षातील याच तिमाहीत हे प्रमाण ६.९० टक्के होते.  

तिमाही तोटा 
जानेवारी ते मार्च २०१८  - ७,७१८ कोटी रुपये 

तिमाही नफा  
जानेवारी ते मार्च २०१७  - २,८१४ कोटी रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com