'एसबीआय'च्या नफ्यात 99.6 टक्के घसरण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

मुंबई - थकित कर्जांच्या तरतुदीत तिप्पटीने वाढ केल्याने सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नफ्यात 99.6 टक्के घसरण झाली असून बॅंकेचा नफा केवळ 20.7 कोटी रुपयांवर आला आहे.

"एसबीआय'ला मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत 4 हजार 991 कोटी रुपयांचा नफा झाला होता. बॅंकेचे एकूण उत्पन्न 72 हजार 918 कोटी रुपयांवर गेले आहे. मागील वर्षी याच काळात ते 66 हजार 828 कोटी रुपये होते. बॅंकेच्या निव्वळ नफ्यात 35 टक्के घसरण होऊन तो 2 हजार 538 कोटी रुपयांवर आला आहे. बॅंकेची प्राप्ती 50 हजार 742 कोटी रुपयांवर गेली असून, मागील वर्षी याच काळात ती 46 हजार 854 कोटी रुपये होती. बॅंकेची एकूण अनुत्पादित मत्ता (एनपीए) म्हणजेच एकूण थकीत कर्जांचे प्रमाण 7.14 टक्‍क्‍यांवर गेले आहे. निव्वळ एनपीए 4.19 टक्‍क्‍यांवर गेला आहे. बॅंकेचा एकूण एनपीए 1 लाख 5 हजार 782 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी याच काळात तो 56 हजार 834 कोटी रुपये होता. यात सुमारे शंभर टक्के वाढ झाली आहे.

Web Title: SBI Q2 profit plunges 99.6% as bad loans rise