स्टेट बँकेला 838 कोटींचा निव्वळ नफा 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 10 मे 2019

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) सरलेल्या चौथ्या तिमाहीत 838.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला  7 हजार 711.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ब्लूमबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार बँकेला 4 हजार 840 कोटी रुपयांचा नफा होणे अपेक्षित होता. 

बँकेला मिळणाऱ्या निव्वळ व्याज उत्पन्नात (एनआयआय) 15 टक्क्यांची वाढ झाली असून ते 22 हजार 954 कोटी रुपयांवर पोचले आहे. या दरम्यान बँकेचे प्रतिशेअर उत्पन्न (ईपीएस) घेतले असून ते 0.94 रुपयावर पोचले आहे. जे डिसेंबर तिमाहीत 4.43 रुपये होते. बँकेच्या बुडीत कर्जासाठीच्या तरतुदीत  174.75 टक्क्यांनी वाढ होऊन ते 16 हजार 501.89 कोटी रुपये झाले. जे याआधीच्या तिमाहीत 6 हजार 006.22 कोटी रुपये होते. 

बँकेच्या थकीत कर्जाच्या परिस्थितीत किंचीत सुधारणा झाली असून नेट एनपीए 3.95 टक्क्यांवरून कमी होत 3.01 टक्क्यांवर आले आहे. तर ग्रॉस एनपीए  8.71 टक्क्यांवरून कमी होत 7.33 टक्क्यांवर पोचले आहे. 

बँक ठेवी:
बँकेतील ठेवी 7.58 टक्क्यांनी वाढून ₹ 29.11 लाख कोटींवर पोचल्या आहेत. 

शुक्रवारी, मुंबई शेअर बाजारात एसबीआयचा शेअर 2.92 टक्क्यांनी वधारून 308.05 रुपयांवर व्यवहार करत स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार बँकेचे 2 लाख 73 हजार 896.33 कोटींचे बाजारभांडवल आहे . 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI reports net profit of ₹838 crore in Q4