स्टेट बँकेकडून कर्जबुडव्यांची यादी जाहीर 

वृत्तसंस्था
Friday, 28 June 2019

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) 10 कर्जबुडव्यांची (विलफुल डिफॉल्टर्स) नावे जाहीर केली आहे. यामध्ये मोठ्या कंपन्या आणि त्यामध्ये मोठ्या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विलफुल डिफॉल्टर्सच्या यादीत फार्मास्युटिकल्स, जेम्स अँड ज्वेलरी, पॉवर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर सेक्टरमधील कंपन्यांचा समावेश आहे.

स्टेट बँकेच्या कफ परेड येथील स्ट्रेस्ड ऍसेट्स मॅनेजमेंट-1 (एसएएम -1) शाखेकडून या कंपन्यांची नवे सार्वजनिक करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यतः मुंबईतील कंपन्यांच्या समावेश आहे. बँकेकडून कर्जाचा भरणा करण्यासाठी अनेकदा सूचना करण्यात आली. मात्र कंपन्यांकडून कोणत्याही कर्जाचा भरणा झालेला नाही. सर्व कंपन्यांवर एकूण 1,500 कोटी रुपयांचे कर्ज आहे. 

स्टेट बँकेने कर्जदारांना कायदेशीर कारवाईची सूचना दिली आहे. येत्या 15 दिवसांच्या आत कर्ज आणि त्यावरील व्याजाचा भरणा न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SBI reveals names of 10 big wilful defaulters