सेबीचा महत्त्वाचा निर्णय: उशिरापर्यंत शेअर बाजारात खरेदी-विक्री करता येणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 4 मे 2018

मुंबई: भारतीय भांडवल बाजार नियामक सेबीने इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये व्यवहाराचा कालावधी (ट्रेडिंग) वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये आता रात्री 11.55 वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे. नवीन बदल 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू करण्यात येणार आहे. सध्या शेअर बाजारात शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार सकाळी 9:00 पासून दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुरु असतात. 

स्टॉक एक्सचेंजला इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये सकाळी 9:00 वाजेपासून रात्री 11:55 वाजेपर्यंत ट्रेडिंग सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटप्रमाणे आता इक्विटी डेरिव्हेटिव्हजमधील व्यवहार उशिरापर्यंत सुरु राहतील. कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये  सकाळी 10:00 ते रात्री 11:55 दरम्यान व्यवहार सुरु असतात. 

स्टॉक एक्स्चेंजने ट्रेडिंग कालावधी वाढवल्यास सेबीची परवानगी घेताना एक्स्चेंजकडील जोखीम व्यवस्थापन प्रणाली, सेटलमेंटची प्रक्रिया, मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे. 

Web Title: SEBI allows exchanges to extend equity deriatives timing to 11:55 pm