राणा कपूर येस बँकेच्या प्रवर्तकपदावरून दूर, सेबीची कारवाई

वृत्तसंस्था
Wednesday, 10 June 2020

येस बँक दुसऱ्या तिमाहीत पब्लिक इश्यू बाजारात आणण्याचे नियोजन करते आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. सेबीच्या नियमावलीनुसार प्रवर्तकांना विशिष्ट माहिती द्यावी लागते. मात्र राणा कपूर यांचे बँकेबरोबर ताणले गेलेले संबंध आणि कोठडीत असल्यामुळे ते माहिती देऊ शकत नसल्याच्या कारणामुळे सेबीने हा निर्णय घेतला आहे.

सिक्युरिटिज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) राणा कपूर यांना येस बँकेच्या प्रवर्तकपदावरून दूर केले आहे. राणा कपूर यांचे वर्गीकरण आता सर्वसामान्य शेअरधारकांच्या यादीत करण्यात आले आहे. सूत्रांकडून यासंदर्भातील माहिती समोर आली आहे. येस बँकेच्या विद्यमान व्यवस्थापन आणि प्रवर्तकांनी सेबीला राणा कपूर यांना प्रवर्तक पदावरून दूर करण्याची विनंती केली होती. त्यानंतर या आठवड्यात सेबीने हा निर्णय घेतला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येस बँक दुसऱ्या तिमाहीत पब्लिक इश्यू बाजारात आणण्याचे नियोजन करते आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली आहे. सेबीच्या नियमावलीनुसार प्रवर्तकांना विशिष्ट माहिती द्यावी लागते. मात्र राणा कपूर यांचे बँकेबरोबर ताणले गेलेले संबंध आणि कोठडीत असल्यामुळे ते माहिती देऊ शकत नसल्याच्या कारणामुळे सेबीने हा निर्णय घेतला आहे.

राणा कपूर आणि अशोक कपूर या दोघांचाही  येस बँकेतील एकत्रित हिस्सा आता 1.42 टक्के इतका आहे. कपूर आणि त्यांचे कुटुंबिय येस कॅपिटल प्रा. लि. आणि मॉर्गन क्रेडिट्स प्रा. लि. या कंपन्यांचे मालक होते. मात्र मागील वर्षी येस बँकेच्या भांडवल उभारणीच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर राणा कपूर यांनी या दोन्ही कंपन्यांमधील आपला पूर्ण हिस्सा विकला होता. 

क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स

यावर्षी मार्च महिन्यात स्टेट बँकेच्या नेतृत्त्वाखालील बँकांच्या गटाने आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेत 10,000 कोटी रुपयांचे भांडवल ओतले आहे. त्यामुळे आता येस बँकेत, स्टेट बँक ऑफ इंडियाचा 48.21 टक्के हिस्सा आहे. या पुनर्रचना योजनेमुळे येस बँकेच्या संचालक मंडळाचे पुनर्गठन करण्यात आले आहे. 

स्टेट बँकेव्यतिरिक्त एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक यांनीदेखील येस बँकेत भांडवली गुंतवणूक केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SEBI removes rana kapoor from promoter position of Yes bank