क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी लक्षात घ्या 'या' टिप्स

विजय तावडे
Wednesday, 10 June 2020

क्रेडिट स्कोअर जितका जास्त तितकी तुमची वित्तीय पत अधिक. तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्ही ऑनलाईन तपासू शकता. क्रेडिट स्कोअरवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. हे लक्षात घेतल्यास आपल्याला क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा करणे शक्य होते. तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्यांची नियमित परतफेड आणि क्रेडिट वापराचे प्रमाण हे काही महत्त्वाचे घटक आहेत.

क्रेडिट स्कोअर हा हल्ली परवलीचा शब्द बनला आहे. क्रेडिट स्कोअर म्हणजे तुमची वित्तीय पत. क्रेडिट स्कोअर जितका जास्त तितकी तुमची वित्तीय पत अधिक. तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्ही ऑनलाईन तपासू शकता. क्रेडिट स्कोअरवर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. हे लक्षात घेतल्यास आपल्याला क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा करणे शक्य होते. तुम्ही घेतलेल्या कर्जाच्या हफ्त्यांची नियमित परतफेड आणि क्रेडिट वापराचे प्रमाण हे काही महत्त्वाचे घटक आहेत. हे दोन्ही घटक मिळून आपल्या क्रेडिट स्कोअरवर 70 टक्के परिणाम करतात. 

  अमेरिका महामंदीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता

क्रेडिट स्कोअरमधून वित्तीय परतफेडीचा पॅटर्न लक्षात येतो. क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी खालील मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.

1. तुमची बिले वेळेवर भरा

जेव्हा बँका किंवा वित्तीय संस्था तुमच्या क्रेडिट रिपोर्ट तपासतात तेव्हा तुम्ही तुमच्या बिलांचा भरणा वेळेवर केलेला आहे की नाही यावर ते मोठा भर देतात. कारण भूतकाळात जर बिलांचे भूगतान नियमितपणे झाले असेल तर भविष्यातदेखील त्यात नियमितपणा असण्याची शक्यता गृहित धरण्यात येते. त्यामुळे क्रेडिट कार्ड, विविध प्रकारच्या कर्जाचे हफ्ते, फोन बिल इत्यादींचे भूगतान नियमितपणे करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे क्रेडिट स्कोअर उत्तम राखण्यास मदत होते.

2. युटिलिटी आणि मोबाईल फोन बिले वेळेवर भरून क्रेडिट स्कोअर वाढवा.
जर तुम्ही तुमची युटिलिटी बिले, मोबाईल फोन बिले वेळेवर भरलीत तर तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा होईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

3. कर्ज किंवा थकबाकीची परतफेड करणे हे केव्हाही चांगले. क्रेडिट कार्डातील थकित बिलाची रक्क्म कमी ठेवणे किंवा इतर रिव्हाल्व्हिंग क्रेडिटचा वापर कमी करणे, त्याच्याशी निगडित बिले जास्त दिवस न थकवता, त्यांचे भूगतान करणे हे क्रेडिट स्कोअर उंचावण्यासाठी उत्तम असते. आपल्या क्रेडिट कार्डातील कमाल मर्यादेच्या 20 ते 25 टक्क्यांपेक्षा जास्त मर्यादा न वापरणे केव्हाही चांगले. त्यामुळे तुमचा युटिलायझेशन रेशो चांगला राहतो. 

4. नव्या क्रेडिट कार्ड किंवा खात्यासाठी खरोखरच गरज असल्यासच अर्ज करा. क्रेडिट कार्डचा जास्त वापर किंवा अनेक क्रेडिट कार्डचा वापर तुमच्या क्रेडिट स्कोअरमध्ये घट करतो.

5. वापरात नसलेली क्रेडिट कार्ड बंद करू नका. जर अशा क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला काही वार्षिक शुल्क भरावे लागत नसल्यास ते बंद न करणेच योग्य. कारण एखादे क्रेडिट कार्ड बंद केल्यामुळे तुमचा क्रेडिट युटिलायझेशन रेशो वाढतो. 

'टर्म इन्श्युरन्स', आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा खांब

6. वारंवार नव्या क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू नका. त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होत असतो.

7. तुमच्या क्रेडिट रिपोर्टची नियमितपणे तपासणी करा. एकाच क्रेडिट बुरोवर अवलंबून न राहता, वेगवेगळ्या बुरोचे क्रेडिट रिपोर्ट बघा. क्रेडिट रिपोर्टमधील माहिती योग्य आहे की नाही हे पडताळा. कारण तुमच्या क्रेडिट रिपोर्टमधील चुकीची माहिती तुमचा क्रेडिट स्कोअर खाली आणू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tips to improve credit score