LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये ४ वर्षात मिळेल एक कोटी रुपये, काय आहे स्कीम ? जाणून घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

LIC Jeevan Shiromani Plan

LIC च्या 'या' पॉलिसीमध्ये ४ वर्षात मिळेल एक कोटी रुपये, काय आहे स्कीम ? जाणून घ्या

भारतीय जीवन वीमा निगम म्हणजेच एलआयसी दिर्घकाळापासून विश्वासपात्र आणि लोकप्रिय आहे. एलआयसीजवळ वेगवेगळ्या वयोगटातील ग्राहकांसाठी वेगवेगळ्या पॉलिसीज असतात. ज्यातून आपण एक चांगला मॅच्युरिटी फंड तयार करू शकतो. एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसीही अशीच आहे. या पॉलिसीद्वारे तुम्ही चार वर्षात एक कोटी रुपये एवढा फंड मिळवू शकता. विशेष म्हणजे यात तुम्हाला प्रीमियम राशी देखील देण्याची आवश्यकता नाही. (LIC Jeevan Shiromani Plan, 4 year plan)

कोणत्या वर्गाला या पॉलिसीचा फायदा होणार ?

एलआयसीची 'एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसी' २०१७ ला सुरू झाली होती. ही एक नॉन लिंक्ड आणि इंडिविज्युअल वीमा योजना आहे. हा एक मनी बॅक प्लॅन असून यात एक करोडचा बेसिक सम एन्शॉर्डसह मनी बॅक प्लॅन आहे. ही पॉलिसी एचएनआई (HNI) म्हणजेच हाय नेटवर्थ इंडिविज्युअल लक्षात ठेवून आणल्या गेली आहे.

किती असणार बेसिक सम एन्शॉर्ड

एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसी मध्ये ५ वर्षासाठी बेसिक सम एन्शॉर्ड एक कोटी रुपये आहे. यासाठी ग्राहकाला चार वर्ष पैसे भरावे लागतील. (Arthavishwa) त्यानंतर रिटर्न मिळायला सुरूवात होईल. ग्राहकाला या पॉलिसीमध्ये दर महिन्याला ९४००० रुपये जमा करावे लागणार आहेत.

असा भरू शकता प्रीमियम

एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसीमध्ये पॉलिसीधारक १४,१६,१८ आणि २० वर्षापर्यंत प्रीमियम भरू शकता.

वय मर्यादा

एलआयसी जीवन शिरोमणी पॉलिसी धारकाचे वय कमीत कमी १८ वर्षे असायला हवे. तर जास्तीत जास्त वय मर्यादा ४५ वर्षांपर्यंत आहे. ४५ वर्षीय ग्राहक २० वर्षापर्यंत तर ४८ वर्षीय ग्राहक १८ वर्षापर्यंत आणि ५१ वर्षीय ग्राहक १६ वर्षापर्यंत प्रीमियम भरू शकतात.

कर्ज घेण्याचीही सुविधा मिळेल

या स्कीम मध्ये ग्राहकास लोन घेण्याचीही सुविधा असेल. लोन घेण्यासाठी ग्राहकास काही अटींसह एक वर्ष प्रीमियम भरावा लागेल. एक वर्ष पूर्ण झाल्यावरच लोन मिळू शकेल.