‘सेबी’च्या अध्यक्षपदी अजय त्यागी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अजय त्यागी यांची भांडवली बाजार नियंत्रक संस्था "सेबी'च्या अध्यक्षपदी निवड शुक्रवारी करण्यात आली. ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे.

नवी दिल्ली: अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी अजय त्यागी यांची भांडवली बाजार नियंत्रक संस्था "सेबी'च्या अध्यक्षपदी निवड शुक्रवारी करण्यात आली. ही निवड पाच वर्षांसाठी असणार आहे.

"सेबी'चे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांचा वाढीव कार्यकाळ 1 मार्चला संपत असून, त्यानंतर त्यागी पदभार स्वीकारणार आहेत. त्यागी हे हिमाचल प्रदेश केडरचे 1984 च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. सध्या आर्थिक कामकाज विभागात ते अतिरिक्त सचिव (गुंतवणूक) आहेत. भांडवली बाजारविषयक प्रकरणे ते हाताळत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवड समितीने त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. त्यागी हे काही काळ रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळातही होते.

Web Title: Senior IAS officer Ajay Tyagi appointed Sebi chief for five years