सेन्सेक्‍समध्ये तेजी परतली

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

मुंबई - ब्लूचिप शेअर्सच्या जोरदार खरेदीने गुरुवारी (ता.६) सेन्सेक्‍समध्ये तेजी परतली. दिवसअखेर सेन्सेक्‍स २२४.५० अंशांच्या तेजीसह ३८ हजार २४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ५९.९५ अंशांची वाढ झाली आणि निफ्टी ११ हजार ५३६ अंशांवर बंद झाला. रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवर ग्रीड, कोल इंडिया, सन फार्मा आदी शेअर्स तेजीसह बंद झाले.

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण तेजीला पोषक ठरले. रिझर्व्ह बॅंकेने बुधवारी चलन बाजारात केलेला हस्तक्षेप आणि बड्या शेअर्समधील खरेदीने सहा सत्रानंतर सेन्सेक्‍स आणि निफ्टीची तेजीच्या दिशेने वळवले. गेल्या सहा सत्रांमध्ये सेन्सेक्‍सने ८७८ अंश गमावले. यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास साडेतीन लाख कोटींचे नुकसान झाल्याचा शेअर बाजार विश्‍लेषकांनी अंदाज व्यक्त केला आहे. आज स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअरमध्ये खरेदी दिसून आली. हेल्थकेअर इंडेक्‍स वधारला. त्याखालोखाल एनर्जी, तेल आणि नैसर्गिक वायू, इन्फ्रास्ट्रक्‍चर, बॅंक्‍सेस आदी निर्देशांक तेजीसह बंद झाले. कन्झुमर ड्युरेबल्स आणि टेक इंडेक्‍समध्ये घसरण झाली.  

टाटा मोटर्स, कोटक बॅंक, टाटा स्टील, एचडीएफसी, विप्रो, एनटीपीसी, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, एचडीएफसी बॅंक आदी शेअर वधारले.

बाजारापुढील चिंता कायम
गुरुवारी ब्लूचिप शेअरमधील खरेदीने सहा दिवस घसरण झालेल्या बाजाराला बळ मिळाले. तरीही अद्याप बाजारापुढील चिंता कायम आहे. डॉलरसमोर रुपयाने ७२ ची नीचांकी गाठली. तेलाच्या वाढलेल्या किमती आणि अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्धामुळे उदयोन्मुख बाजारांतील गुंतवणूक ओघ घटला आहे, असे जिओजित फायनान्शिल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex up