esakal | शेअर बाजारात सकारात्मकता; सेन्सेक्स 42 हजारांवर
sakal

बोलून बातमी शोधा

sensex is on 42 thousand

सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजार देखील वधारला होता. परिणामी मुंबई शेअर बाजर निर्देशांक सेन्सेक्सने पहिल्यांदाच 42 हजारांची पातळी ओलांडली.

शेअर बाजारात सकारात्मकता; सेन्सेक्स 42 हजारांवर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी संघर्ष मिटण्याच्या दृष्टीने पहिल्या टप्प्यात झालेल्या करारानंतर जागतिक शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आले. त्याचा परिणाम म्हणून सकाळच्या सत्रात भारतीय शेअर बाजार देखील वधारला होता. परिणामी मुंबई शेअर बाजर निर्देशांक सेन्सेक्सने पहिल्यांदाच 42 हजारांची पातळी ओलांडली.

'FD'वर अधिक व्याज मिळविण्याचे 'हे' आहेत 4 स्मार्ट मार्ग

सकाळच्या सत्रात सेन्सेक्स 185 अंकांनी वधारून 42,059.45 अंकावर पोहोचला होता. त्यानंतर मात्र बाजारात हलकीशी घसरण होऊन सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे 41,858.73 व 12,332.40 वर व्यवहार करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आयात कराच्या मुद्द्यावर मागील 18 महिन्यांपासून अमेरिका व चीनमधील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. ताणलेले संबंध निवळण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांमध्ये प्राथमिक स्वरूपाचा करार करण्यात आला. त्याला जागतिक गुंतवणूकदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याचबरोबर, 1 फेब्रुवारीला देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प मांडला जाणार असून, या दोन्ही घटनांच्या पार्श्वभूमीवर भारतीय गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली.