सेन्सेक्समध्ये 50 अंशांची वाढ; निफ्टी पुन्हा 8400 पातळीवर

वृत्तसंस्था
सोमवार, 16 जानेवारी 2017

मुंबई: आशियाई बाजारातील कमकुवत घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराची सुरुवात आज(सोमवार) नकारात्मक झाली. सेन्सेक्स 50 अंशांनी कोसळला होता तर निफ्टी 8,400 अंशांपेक्षा खालची पातळी गाठली होती. मात्र, काही वेळातच दोन्ही निर्देशांक सावरले असून निफ्टीने पुन्हा 8400 अंशांची पातळी गाठली.

सध्या(10 वाजून 45 मिनिटे) सेन्सेक्स 48.86 अंशांच्या वाढीसह 27,286.92 पातळीवर व्यवहार करत आहेत. दरम्यान, निफ्टी 8,408.90 पातळीवर व्यवहार करत असून 8.55 अंशांनी वधारला आहे.

बाजारातील बहुतांश क्षेत्रांमध्ये तेजीसह व्यवहार सुरु असले तरीही एफएमसीजी आणि आयटी क्षेत्रावर दबाव निर्माण झाल्याचे दिसून आले. निफ्टीवर अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, आयडिया सेल्युलर, झी एन्टरटेनमेंट आणि टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर एचसीएल टेक, इन्फोसिस, आयशर मोटर्स, टेक महिंद्रा आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स सर्वाधिक कोसळले होते.

Web Title: Sensex 50 points in growth; Nifty 8400 level again