Share Market: घसरणीनंतर भांडवली बाजार उसळला

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 20 November 2020

देशातील भांडवली बाजारात आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सुरुवातीला तेजी दिसून येत आहे

मुंबई: देशातील भांडवली बाजारात आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सुरुवातीला तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी सकाळीच सेन्सेक्स आणि निफ्टीच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये 132.18 अंशांनी वाढ होऊन तो 43,732.14 अंशावर गेला आहे. तर निफ्टीमध्ये 63 अंशांची वाढ झाली असून निफ्टी (Nifty) 12,835 अंशांवर गेला आहे. 
 
सत्राच्या सुरुवातीला बजाज फायनान्स, एल अॅण्ड टी आणि टाटा स्टील मध्ये सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. तर RIL बजाज फायनान्स आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसत आहेत.

नवीन गुंतवणुकदारांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं; कुठे, केव्हा, कशी गुंतवणूक करावी, वाचा...

सध्या मोठ्या शेअर्ससह मिडकॅपच्या शेअर्समध्येही वाढ होताना दिसत आहे. BSEचा मिडकॅप निर्देशांक 0.83 टक्के दराने व्यवहार करत आहे. स्मॉलकॅपच्या शेअर्समध्येही मोठी खरेदी होत आहे. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 0.67 टक्के दराने व्यवहार करत आहे. तेल-वायूच्या शेअर्समध्येही आज खरेदी दिसून येत आहे. बीएसईचा तेल आणि वायू निर्देशांक 0.74 टक्के दराने व्यवहार करत आहे.

2021 ऑटो इंडस्ट्रीसाठी भरभराटीचं! TATA आणि Mahindra कडून नव्या कारचे लॉचिंग

गुरुवारी घसरणीने बाजार बंद झाला होता-
 गुरुवारी भांडवल बाजारात शेवटी मोठी घसरण झाली होती. सेन्सेक्स 580.09 अंशांनी म्हणजे 1.31%  घसरून 43,599.96 अंशांवर स्थिरावला आणि निफ्टीचा निर्देशांक 166.60 अंशांनी घसरून 12,771.70 अंशांवर स्थिरावला होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex and Nifty both are increasing morning trading