2021 ऑटो इंडस्ट्रीसाठी भरभराटीचं! TATA आणि Mahindra कडून नव्या कारचे लॉचिंग

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 19 November 2020

कोरोनामुळे 2020 वर्ष तसं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला मोठं तोट्याचं गेलं. दुसऱ्या तिमाहीत बाजारात काही प्रमाणात तेजी आली होती.

नवी दिल्ली: कोरोनामुळे 2020 वर्ष तसं ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला मोठं तोट्याचं गेलं. दुसऱ्या तिमाहीत बाजारात काही प्रमाणात तेजी आली होती. पण 2021 वर्ष ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजला भरभराटीचं असणार आहे. कारण पुढील वर्षी Tata आणि Mahindra या प्रसिध्द कंपन्या 2021मध्ये 4 SUV भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहेत.

TATA लाँच करणार 2 कार-
टाटा मोटार्स 2021मध्ये भारतात Tata Gravitas आणि  HBX च्या धर्तीवर एक SUV लाँच करणार आहे. एचबीएक्स संकल्पनेवर आधारित एसयूव्ही एक छोटी एसयूव्ही असणार आहे. मागील काळात भारतात मिनी एसयूव्ही सेगमेंट चांगलाच प्रसिध्द झाला आहे. त्यामुळे सर्व कार उत्पादक ब्रँड या सेगमेंटमध्ये नवीन गाड्या लाँच करत आहेत. जानेवारी ते मार्च या पहिल्या तिमाहीत या गाड्या भारतात लाँच केल्या जातील.

SpaceXचे एलन मस्क ठरले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती

महिंद्राही लाँच करणार दोन SUV-
2021च्या पहिल्या सहामाहीत महिंद्रा दोन प्रसिध्द एसयूव्हींचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करणार आहे. यामध्ये महिंद्रा XUV 500 आणि स्कॉर्पिओसारखी गाडीचा समावेश आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये डिझाइनपासून इंजिन आणि पॉवरमध्ये मोठे बदल दिसून येतील.

Boycott China: भारताशी नडल्याने चीनला 40 हजार कोटींचा तोटा

ग्रेविटस 7 सीटर हॅरियरची दुसरं वर्जन-
Tata Gravitas हॅरियरची दुसरी आवृत्ती असणार आहे ज्या गाडीला कंपनी बाजारपेठेत टाटा ग्रॅव्हिटास असे नाव देणार आहे. कंपनीने फेब्रुवारी महिन्यात ऑटो एक्स्पोमध्ये ही गाडी लाँच केली होती. BS6 इंजिन असलेल्या टाटा ग्रॅव्हिटासमध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह 2.0 लिटरक्रायोटेक डिझेल इंजिन आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahindra and TATA 4 SUV will launch in 2021