नवीन गुंतवणुकदारांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं; कुठे, केव्हा, कशी गुंतवणूक करावी, वाचा...

investment.
investment.

पुणे: योग्य ठिकाणी गुंतवणूक केली तर त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बचतीची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करु शकता. बरेचजण पैसे गमावण्याच्या भीतीने गुंतवणूक करत नाहीत. पण योग्य मार्गदर्शनाने पैशांची गुंतवणूक केली तर त्याचा फायदा होतो. 

पहिल्यांदा आपण गुंतवणूक का करावी याबद्दल माहिती घेऊया- 
जरी तुमच्या उत्पन्नात सातत्य नसलं तरी गुंतवणूक तुम्हाला एक प्रकारची आर्थिक सबळता देत असते. इथं काही कारणं दिली आहेत, ज्यामुळे तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे.

1. संपत्ती वाढवा-
संपत्ती वाढवण्यात गुंतवणूकीचा मोठा फायदा होतो. गुंतवणुकीचे अनेक पर्याय असून त्यामध्ये बाँड्स, स्टॉक, सरकारी योजना आणि डिपॉझिट योजनांचा समावेश होतो. विशेष म्हणजे यावर चांगला परतावाही मिळतो.

2. सेवानिवृत्तीनंतरचा चांगला पर्याय-
सेवानिवृत्तीनंतर चांगलं आयुष्य जगण्यासाठी गुंतवणूक महत्वाची आहे. बचतीचं योग्य नियोजन करुन म्युचुअल फंड, बाँड, स्टॉक्समध्ये केलेली गुंतवणूक उपयोगी ठरेल.

3. स्वतःचा नवीन व्यवसाय सुरु करु शकाल-
तुम्ही केलेल्या बचतीमधून एखादा व्यवसाय सुरु करू शकता. एखादा व्यवसाय सुरु करूनही तुम्ही पैशांचा वापर चांगल्या ठिकाणी करू शकता.

गुंतवणूकीचं नियोजन कसं करावं-
नवीन गुंतवणूक करणाऱ्यांनी सुरुवातीला कमी रक्कम गुंतवावी, कारण सुरुवातीलाच जोखीम घेणे टाळावे. सुरुवातीच्या गुंतवणुकीतून जर तुम्हाला फायदा होत गेला तर तुमचा आत्मविश्वासही वाढेल. त्यानंतर तुम्ही तुमची गुंतवणूक वाढवू शकता. तसेच तुम्ही निवडलेला गुंतवणुकीचा पर्यायात तुमच्या सर्व गरजा भागवून गुंतवणूक केली पाहिजे. 

गुंतवणुकीचा पर्याय निवडताना चांगला अभ्यास करून किंवा योग्य सल्ल्याने निवडला पाहिजे. कमी वेळात जास्त पैशे देणाऱ्या योजनांवर लगेच विश्वास ठेवून गुंतवणूक करणे टाळले पाहिजे. अशा योजनांमध्ये मोठा धोका असतो. तुमच्या गुंतवणुकीचा नेहमी आढावा घेतला पाहिजे. गुंतागुंतीच्या ठिकाणी गुंतवणूक करणे टाळले पाहिजे.

गुंतवणुकीचे देशातील टॉप पाच पर्याय- 

1. Mutual fund-
हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. काही योजनांमध्ये 5 वर्षांनंतर चांगला परतावा मिळतो. Mutual fund मध्ये गुंतवणुक करताना योग्य सल्लागार असल्याचा फायदा मोठा होतो. त्यामुळे पैशांची जोखीम कमी असते. 

2. Public Provident Fund- 
या गुंतवणुकीवर कर आकारला जात नाही त्यामुळे PPF मध्ये गुंतवणुक केल्याचा मोठा फायदा होताो. Public Provident Fund वर सरकारचं नियंत्रण असल्याने याला चांगलं व्याजदरही मिळतं, जे काही बँकापेक्षाही चांगलं असतं. 

3. Recurring Deposits: 
या योजनेत ग्राहक लहान लहान उत्पन्नाची गुंतवणूक करु शकतात. महिन्याच्या पगारातील काही उत्पन्न तुम्ही इथं गुंतवणुक करू शकता. ही गुंतवणुक भविष्यासाठी उपयोगाची ठरु शकते. 

4. National Savings Certificate:
हा देखील गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. यावर देखील सरकारचे नियंत्रण असल्याने ही गुंतवणूक सुरक्षित असते. या योजनेचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो, यावर आकर्षक व्याजही मिळत असते.

5 .गोल्ड ईटीएफ- 
गोल्ड एक्स्चेंज ट्रेडर्ड फंडांच्या ( Gold Exchange-traded fund) माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करता येते. सोने ईटीएफचे युनिट्स शेअर बाजारात सूचीबद्ध असतात. ग्राहक हे युनिट्स तिथून विकत घेऊ शकतात. याची किंमत सोन्याच्या किंमतीवरच अवलंबून असते. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाउंट असणे आवश्यक आहे.

(edited by- pramod sarawale)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com