शेअर बाजार घसरणीसह बंद 

वृत्तसंस्था
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मुंबई: अमेरिका-चीन देशांदरम्यान सुरु असलेल्या व्यापार वाटाघाटी किती सकारात्मक राहतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाटचालीबद्दल असलेल्या साशंकतेमुळे जागतिक शेअरबाजारात आलेल्या घसरणीचा दबाव भारतीय शेअर बाजारावर देखील होताना पाहायला मिळाला. आज भारतीय शेअरबाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 250 अंशांनी घसरून 35,884 वर बंद झाला तर, निफ्टीमध्ये 86 अंशांची घसरण होऊन 10,782 वर स्थिरावला.  

जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज प्रामुख्याने धातू क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. जिंदाल स्टील अँड पॉवर ली., हिंदाल्को, वेदांता, टाटा स्टील यांसारख्या प्रमुख कंपन्यांचे शेअर्स 5 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. याशिवाय, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुती सुझुकी इत्यादी कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री पाहायला मिळाली. तर, दुसरीकडे, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, विप्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये हलकी तेजी होती. 

रुपया घसरला 

आशियाई चलनांमध्ये डॉलरच्या तुलनेत झालेली घसरण आणि आरबीआयकडून व्याजदरात बदल ना झाल्याने रुपया काहीसा घसरताना दिसला. आंतरराष्ट्रीय चलन डॉलरच्या तुलनेत रुप्याचे मूल्य 7 पैशानी घसरून 70.57 वर स्थिरावले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sensex Closes 249 Points Lower, Nifty Settles At 10,784