शेअर बाजार गडगडला 

पीटीआय
शनिवार, 24 मार्च 2018

जागतिक पातळीवरील व्यापार युद्धाच्या भीतीने घसरण 

मुंबई : जागतिक पातळीवर व्यापार युद्ध होण्याच्या भीतीने शेअर बाजार शुक्रवारी गडगडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 410 अंशांनी कोसळून पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी या वर्षात पहिल्यांदाच दहा हजार अंशांच्या पातळीखाली बंद झाला. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनच्या उत्पादनांवर जादा कर लादले असून, चीननेही याला प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा करआकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जागतिक पातळीवर व्यापार युद्ध सुरू होण्याची भीती निर्माण झाली आहे. या भीतीमुळे अमेरिकेतील "वॉलस्ट्रीट'सह आशियाई आणि युरोपीय शेअर बाजार गडगडले. याचाच परिणाम देशांतर्गत शेअर बाजारावर झाला. 
सेन्सेक्‍स आज 409 अंश म्हणजेच 1.24 टक्के गडगडून 32 हजार 596 अंशांवर बंद झाला. ही निर्देशांकाची मागील पाच महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. याआधी गेल्या वर्षी 23 ऑक्‍टोबरला निर्देशांक 32 हजार 506 अंशांवर बंद झाला होता. निफ्टी आज 116 अंश म्हणजेच 1.15 टक्के घसरणीसह 9 हजार 998 अंशांवर बंद झाला. मागील पाच महिन्यांतील निफ्टीची ही नीचांकी पातळी आहे. गेल्या वर्षी 11 ऑक्‍टोबरला निर्देशांक 9 हजार 984 अंशांवर बंद झाला. 

बांधकाम, धातू, बॅंकिंग, कॅपिटल गुड्‌स, आरोग्यसुविधा, सार्वजनिक, वाहननिर्मिती आणि तेल व नैसर्गिक वायू क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागात आज मोठी घसरण झाली. धातू क्षेत्रामध्ये सेल, जिंदाल स्टील, वेदांत, हिंदाल्को, नॅशनल ऍल्युमिनियम, हिंदुस्थान झिंक, टाटा स्टील, एनएमडीसी आणि जेएसडब्लू यांच्या समभागात 6.58 टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. सलग चौथ्या आठवड्यात सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली आहे. 

- गुंतवणूकदारांनी गमावले 1.57 लाख कोटी रुपये 
- सेन्सेक्‍स पाच महिन्यांतील नीचांकी पातळीवर 
- निफ्टी दहा हजार अंशांच्या पातळीखाली बंद 
- धातू क्षेत्रातील कंपन्यांना सर्वाधिक फटका 
- दोन्ही निर्देशांकात सलग चौथ्या आठवड्यात घसरण 

Web Title: Sensex closes 400 points lower