सेन्सेक्‍समध्ये किरकोळ घसरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

मुंबई - वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीने गुरुवारी शेअर बाजारात घसरणीचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ३२ अंशांची घसरण होऊन ३८ हजार ६९० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५ अंशांची घट होऊन ११ हजार ६७६ अंशांवर स्थिरावला. पहिल्या तिमाहीची एकूण देशांतर्गत उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी उद्या (शुक्रवारी) जाहीर होणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यातच खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल ७७ डॉलरवर गेला आहे.

मुंबई - वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीने गुरुवारी शेअर बाजारात घसरणीचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स आज ३२ अंशांची घसरण होऊन ३८ हजार ६९० अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १५ अंशांची घट होऊन ११ हजार ६७६ अंशांवर स्थिरावला. पहिल्या तिमाहीची एकूण देशांतर्गत उत्पन्नाची (जीडीपी) आकडेवारी उद्या (शुक्रवारी) जाहीर होणार आहे. याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यातच खनिज तेलाचा भाव प्रतिबॅरल ७७ डॉलरवर गेला आहे. इराण, व्हेनेझुएला आणि अमेरिकेकडून तेलपुरवठा कमी होण्याची शक्‍यता असल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sensex decrease